पुणे : ससूनमध्ये कोविड रुग्णालय उभारण्यात तेथे दाखल रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील विविध हॉस्पिटलमधील साठ खासगी डॉक्टर यांची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे. आता हे डॉक्टर ससून हॉस्पिटलमध्ये कार्यरत राहणार आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोना संसर्ग वाढण्याची शक्य लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्यासाठी ससून रूग्णालयात स्वतंत्र कोविड-19 हॉस्पीटल उभारण्यात आले आहे. तेथील 140 डॉक्टर आणि नर्स यांची सात दिवसांची ड्यूटी संपल्याने त्यांना क्वॉरंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या साठ डॉक्टर यांच्या सेवा अधिगृहित केल्या आहे. यापूर्वी 40 डॉक्टर यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या होत्या.
Video : आठ बाय आठ फुटांच्या खोलीत, कसं पाळायचं डिस्टंसिंग?
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी हे या प्राधिकारणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कोव्हीड 19 साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी डॉक्टरांची सेवा अधिष्ठाता शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय,पुणे यांच्याकडे अधिग्रहीत केल्या आहेत.
ठरलं : पुण्यात विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडणार
खासगी रूग्णालयातील अधिग्रहित करण्यात आलेल्या डॉक्टर सात दिवस ससून रुग्णालयात कार्यरत असणार आहे. त्यानंतर ते राहत असलेल्या हॉटेल मध्येच सात दिवस त्यांना विलगीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना सोडण्यात येणार आहे. जेणेकरून या विषाणूची त्यांना बाधा होऊ नये, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.