पुणे

निवडणुकीमुळे बारामतीमधील 64 जणांवर कारवाई

मिलिंद संगई

बारामती : शुक्रवारी (ता. 15) होणा-या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी पोलिस दल सज्ज झाल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी आज दिली. तसेच या निवडणूकीसाठी पोलिसांनी 64 जणांना त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवत तडीपार करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळच्या सत्रात दोन तासात मतदान उरकून संबंधिताने तालुक्याबाहेर जायचे आहे.

बारामती तालुक्यात 49 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीत 119202 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सदरची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. 

बारामती व इंदापूर या दोन तालुक्यांसाठी 40 अधिकारी, 300 पोलिस कर्मचारी व 350 होमगार्ड तैनात करण्यात येणार असून त्यार रिझर्व्ह सेंट्रल फोर्सचे पथक असून राज्य राखीव दलाच्याही दोन तुकड्या तैनात करण्यातयेणार आहे. या निवडणूकीसाठी एकूण 28 विभाग करण्यात आले असून प्रत्येक सेक्टरसाठी एक वाहन, एक अधिकारी, दोन पोलिस कर्मचारी, दोन होमगार्ड असे पथक मतदानादरम्यान परिस्थितीवर नियंत्रण ठेवणार आहे. 

दरम्यान बारामती तालुक्याली संवेदनशील गावात पोलिसांनी रुटमार्च काढत शक्तीप्रदर्शन केले आहे. वडगाव निंबाळकर, को-हाळे, निंबूत, नीरावागज, पिंपळी, सांगवी, सोनगाव, सावळ, मोढवे, मळद, होळ, कांबळेश्वर आदी ग्रामपंचायतींवर पोलिसांची विशेष नजर असेल. 

64 जण दोन दिवसांसाठी तडीपार-या निवडणूकीसाठी पोलिसांनी 64 जणांना त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवत तडीपार करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळच्या सत्रात दोन तासात मतदान उरकून संबंधिताने तालुक्याबाहेर जायचे आहे. निवडणूक प्रक्रीयेस बाधा येईल असे कृत्य कोणीही करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिस कठोर कायदेशीर कारवाई करतील, असा इशारा नारायण शिरगावकर यांनी दिला आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT