Action against election officials of housing organization  Sakal
पुणे

कोंढव्यातील गृहरचना संस्थेच्या निवडणूक अधिकाऱ्यांवरही बडतर्फीची कारवाई

संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांना बडतर्फ करण्यात आले आहे

सकाळ वृत्तसेवा

कोंढवा - शिवशंकर गिरिजा सहकारी गृहरचना संस्था मर्यादित संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांना बडतर्फ करण्यात आल्यानंतर निवडणूक अधिकारी गौरी सचिन लोखंडे यांच्यावरही बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. संस्थेचे सभासद शराफत खान यांचे वकील राजू नाईक यांनी संस्थेचे निवडणूक अधिकारी यांचे कार्यपध्दतीबाबत विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे यांच्याकडे तक्रार करून त्यांना सहकार खात्याचे निवडणूक पॅनेलवरून कमी करण्याची विनंती केली होती. निवडणूक अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४चे नियम ७६मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे उपनिबंधक सहकारी संस्था पुणे-४ यांच्याकडील अहवाल आधारे हे स्पष्ट झाले.

निवडणूक अधिकारी यांनी नियमाचे उल्लंघन करीत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. प्रारूप व अंतिम मतदारयादी जाहीर केली नाही, सभासदांना अंतिम यादीची पडताळणी करण्याची, हरकत घेण्याची व सूचना मांडण्याची संधी दिली नाही. अंतिम मतदार यादीची तारीख आणि निवडणूक नामनिर्देषन पत्रे दाखल करण्याची तारीख याबाबतचे मार्गदर्षक तत्वाचे पालन करण्यात आले नाही. नामनिर्देषनपत्र दाखल करणेचा कालावधी ५ दिवस ठेवणे आवश्यक असताना १५ दिवस ठेवला असल्याची कारणे नमूद करून विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे यांनी निवडणूक अधिकारी गौरी लोखंडे यांना ई-वर्गातील सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नामतालिकेवरून कमी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT