crime 
पुणे

उरुळीतील उद्योजकाचे अपहरण करणाऱ्या टोळीच्या अशा आवळल्या मुसक्या  

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील उद्योजकाचे अपहरण करून त्यास वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी मारहाण करणाऱ्या चार जणांच्या टोळीवर लोणी काळभोर पोलिसांनी मोकाअंतर्गत कारवाई केली आहे. 

अजिंक्य उत्तम कांबळे (वय ३४, रा. टिळेकरवाडी. ता हवेली) हा मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या टोळीचा प्रमुख असुन, ऋतिक विजय दरेकर, प्रतिकेश उत्तम लोणकर (रा. दोघेही सहजपूर, ता. दौंड) व समीर जावेद सय्यद (रा. सहकारनगर, टिळेकरवाडी, ता. दौंड) हे त्याचे सहकारी आहेत. अजिंक्य कांबळे याच्यासह या चौघांनी सहा महिन्यांपूर्वी उद्योजक विशाल बापू खेडेकर यांचे अपहरण करून त्यांना वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी मारहाण केली होती. 

दरम्यान, अजिंक्य कांबळे याच्यासह या चार जणांच्या टोळीवर लोणी काळभोर पोलिसांनी मोकाअंतर्गत कारवाई करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे व भक्कम पुरावे कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे सादर केली होती. त्यानुसार या टोळीवर मोकाअंतर्गत कारवाई करण्याच्या प्रस्तावास विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाने मंजुरी दिली, अशी माहिती लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यांनी सांगितले की, अजिंक्य कांबळे व त्याच्या वरील तीन सहकाऱ्यांनी सहा महिन्यांपूर्वी उरुळी कांचन येथील प्लॉटिंग व्यावसायिक विशाल खेडेकर यांचे अपहरण करून त्यांना वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी मारहाण केली होती. याबाबत गुन्हा दाखल होताच चारही आरोपी फरारी झाले होते. त्यांना शोधण्यासाठी लोणी काळभोरचे सहायक पोलिस निरीक्षक पवन चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधमोहीम राबवली होती. यात एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अंजिक्य कांबळे हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला. मात्र, उर्वरीत तीनही आरोपी अद्याप फरारी आहेत. याच दरम्यान या चारही आरोपींचे गुन्हे लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाईसाठी परवानगी मागीतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : १८ वर्षांखालील व्यक्तींसाठी सोशल मीडिया खात्यांवर निर्बंध असावेत: सर्वोच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT