पुणे

खोरला वाळूमाफिया विरोधात कारवाई; 1 कोटींचा मुद्देमाल जप्त 

प्रा. संतोष काळे

राहू : खोर नजीक डोंबेवाडी (ता. दौंड) येथे यवत पोलिस व महसूल विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत  वाळू माफियांविरोधात 1 कोटी 8 लाख रुपये किंमतीची मुद्देमालासह वाहने जप्त केली असून, संतोष दिलीप डोंबे, दत्तात्रेय अण्णा डोंबे, सोमनाथ रघुनाथ डोंबे, विशाल किसन पिसे, सागर अनंता डोंबे, गणेश दत्तात्रय डोंबे रा. सर्व जण खोर नजीक डोंबेवाडी (ता. दौंड) या सहा जणांविरोधात यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.

गुरुवारी पोलिसांनी छापा टाकत बेकायदेशीर वाळू उपसा करणारे तीन जेसीबी मशीन,  सहा ट्रॅकटर जप्त केले आहेत. तर सहा वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफिया विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. खोर हद्दीतील डोंबेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी महसूलच्या काही कर्मचारी वर्गाला बरोबर घेत या ठिकाणी छापा टाकला असता तीन जेसीबी व सहा ट्रकटर जप्त करून ताब्यात घेतले.

या प्रकरणी खोर मधील 6 जणांच्या वर तसेच अज्ञात वाहनचालकांच्या वर पर्यावरण कायद्याअंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. याबाबत वरवंडचे मंडलाधिकारी महेश गायकवाड यांनी यवत पोलिसांत फिर्याद दिली आहे .खोर सारख्या जिरायती भागात एवढी मोठी कारवाई झाल्याने वाळू माफियांचे दाबे दणाणले आहेत.

या कारवाईमध्ये सहायक फौजदर नंदकुमार लोणकर, पोलीस हवालदार  खाडे, रणजित निकम, हेमंत कुंजीर, सुजित जगताप, किरण तुपे, संपत खबाले, अजित काळे, संतोष पंडित आणि महसूलचे पथकांनी कारवाई केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे करत आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT