deccan-qween.jpg 
पुणे

Video : डेक्कन क्वीन पॅन्ट्रीच्या ठेकेदारावर होणार कारवाई 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : डेक्कन क्वीन मधील डायनिंग कारमध्ये ऑम्लेटमध्ये आळ्या सापडल्याचे प्रकरण 'सकाळ'च्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध होताच मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने 'सकाळ'शी संपर्क साधून याबाबत संबंधित ठेकेदारावर तातडीने कारवाई करणार असल्याचं जाहीर केले आहे. मध्य रेल्वे या बाबत 'आयआरसीटीसी'शी संपर्क साधून या बाबत कारवाई करणार असल्याचे रेल्वेचे वरीष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी सांगितले.

डेक्कन क्वीन च्या पॅन्ट्री कारमध्ये अंड्याच्या ऑम्लेट मध्ये आळ्या सापडण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या उपप्रबंधक कार्यालयामध्ये बुधवारी लेखी तक्रार करण्यात आली आहे. प्रवासी सागर काळे हे मुंबईवरून पुण्याला येत असताना त्यांनी ऑम्लेटची ऑर्डर दिली होती. त्यावेळी ऑम्लेटमध्ये आळ्या सापडल्या तर त्याच्या बरोबर देण्यात आलेला चाट-मसाला मधून किडे बाहेर पडत असल्याचे दिसून आले. या घटनेचे त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले असून ते देखील रेल्वे प्रशासनाकडे सोपवले आहे.

VIdeo : डेक्कन क्वीनच्या पॅन्ट्रीमध्ये ऑम्लेटमध्ये सापडल्या आळ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Red Alert: नाशिकला रेड अलर्ट; अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सप्तशृंगी गड व नांदुरी घाट मार्ग ७ ते ९ जुलैपर्यंत भाविकांसाठी बंद

Junnar Rains : जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसाने धरणसाठा वाढला; अलदरेतील बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Pune Mula-Mutha flood : मुळा-मुठा नदीला पूर; कोरेगाव मुळ येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पुल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला

India T20I Squad: भारताचा T20I संघ जाहीर! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजू सॅमसनला डच्चू, तर रिंकू सिंगचे पुनरागमन

Raigad Flood : रायगडमध्ये मुसळधार पावसाने कहर; सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा नद्या धोक्यापलीकडे, जनजीवन विस्कळीत

SCROLL FOR NEXT