Ritesh Kumar Sakal
पुणे

Pune News : बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करावी; भाजपच्यावतीने पोलिस आयुक्तांना निवेदन

पुणे शहरात बांगलादेशी घुसखोर बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरात बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वास्तव्य करीत आहेत. अशा बांगलादेशी घुसखोरांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहर भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलिस आयुक्तांना दिले.

शहरात बांगलादेशी घुसखोर बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी कोथरूड येथून दोन दहशतवाद्यांना नुकतीच अटक केली. या पार्श्वभूमीवर शहर भाजपच्या वतीने गुरुवारी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांना निवेदन देण्यात आले. शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी शहराध्यक्ष घाटे यांनी केली.

या प्रसंगी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी आमदार योगेश टिळेकर, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, दीपक पोटे, अजय खेडेकर, राजेंद्र शिळीमकर, धनराज घोगरे, बापू मानकर, विकास लवटे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भविष्यवेध : मायक्रोबायोलॉजी की बायोटेक्नॉलॉजी?

१०० एकरावरील सोयाबीन उगवलेच नाही! सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील १२ शेतकऱ्यांच्या ‘कृषी’कडे तक्रारी; पावसाअभावी ८ तालुक्यांत पेरणी खोळंबली, १५ दिवसांनंतर दुबार पेरणीचे संकट

आजचे राशिभविष्य - 15 जुलै 2026

Fifa World Cup Semi Final: फ्रान्स अन् एम्बाप्पेची मक्तेदारी संपुष्टात! स्पेनची बाचवभींत ओलांडण्यात अपयशी, 'Tiki-Taka' ने कमाल दाखवली

Pune Crime : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीचे ‘पुणे कनेक्शन’; ‘एटीएस’कडून ६६ जणांची चौकशी, काही संशयित ताब्यात

SCROLL FOR NEXT