Action taken against doctor for advising to take Alcohol for corona.jpg 
पुणे

कोरोनासाठी मद्यपानाचा उतारा चांगला; डॉक्टरांचा सल्ला पडला महागात

सकाळन्यूजनेटवर्क

कोरोनासाठी मद्यपानाचा उतारा चांगला; डॉक्टरांचा सल्ला पडला महागातशिक्रापूर-सणसवाडी-तळेगाव ढमढेरे याभागात कोरोना रुग्णांची आकडेवारी पन्नाशीत गेली आहे. २२ मार्च पासून या भागात कोरोना रुग्ण टप्प्याटप्प्याने आढळत आहेत. एका वैद्यकीय व्यावसायिकालाही कोरोना संसर्ग झाल्याचेही याभागात सर्वश्रुत आहे. दरम्यान, सोशल डिस्टंसिंगच्या बाबतीत शिक्रापूर पोलिस सजग आहेत हेही सर्वांना ठाऊक आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सणसवाडी-तळेगाव ढमढेरे या भागातील एका जेष्ठ वैद्यकीय व्यावसायिकाने ’कोरोनासाठी मद्यपान हा चांगला उतारा आहे तो आवर्जून करावा. आखाड आहेच तर त्याचाही लाभ घ्यावा’ असा सल्ला स्पंदन वैद्यकीय संघटनेतील काही जणांना दिला. या सल्ल्याला अनेकजण बळी पडले आणि शनिवारी (ता.१८) रात्री तळेगाव-ढमढेरे येथील एका फार्महाऊसवर छानपैकी कोरोना-मद्यपार्टी सुरू झाली. पार्टी सुरू होताच एका राजकीय बड्या नेत्याने ही बाब थेट जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या कंट्रोलला कळविली. तातडीने चक्रे फिरली आणि शिक्रापूर पोलिसांचे पथक संबंधित फार्महाऊसवर पोहचताच सर्व डॉक्टरांना रंगेहाथ पकडले. या सर्वांसह दोन फार्महाऊस मालक यांचेवर सोशल डिस्टंसिंगसह जिल्हाधिकाऱ्यांंच्या आदेशाचे उल्लंघन आदी गुन्हे दाखल करण्यात आले. या सर्वांना लवकरच शिरुर न्यायालयात हजर व्हावे लागणार असून न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई आम्ही करणार असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले. अधिक तपास फौजदार राजेश माळी करीत आहेत.

समन्वय ठेवता येत नसेल तर वेगळा विचार करु - अजित पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT