activities continue to remain shut during lockdown 
पुणे

कसा असेल लॉकडाऊन 3.0? 'या' गोष्टींना असणार बंदी 

पीटीआय

पुणे :  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील 733 जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी केली आहे. यात देशातील 130 जिल्हे रेड झोनमध्ये असून, महाराष्ट्रातील पुणे, मुंबईसह 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. आरोग्या मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनचा कालावधी 3 मे रोजी संपल्यानंतर या जिल्ह्यांत निर्बंध लागू राहणार आहेत. याचवेळी ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात येतील तर ग्रीन झोनमध्ये निर्बंध अतिशय कमी प्रमाणात असतील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

याचबरोबर दिल्ली, मुंबई, कोलकता, हैदराबाद, बंगळूर आणि अहमदाबाद या महानगरांमध्ये लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतरही निर्बंध असणार आहेत. 
राज्यात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक मुंबई आणि पुण्यात झाला आहे. येथील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या हा भाग रेड झोनमध्ये आहे. येथील निर्बंध 3 मेनंतर आणखी वाढतील. मुंबई, पुण्यासह ठाणे, पालघर, सातारा, नाशिक, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, धुळे, अकोला, जळगाव आणि रायगड हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लॉकडाउनमध्ये यावरील बंदी कायम 
- हवाई प्रवास 
- रेल्वे सेवा (स्थलांतरित कामगारांसाठीच्या विशेष गाड्यांचा अपवाद)  
- मेट्रो सेवा 
- आंतरराज्य रस्ते वाहतूक 
- शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग संस्था 
- हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि इतर हॉस्पिटॅलिटी सेवा 
- गर्दीची ठिकाणे - चित्रपटगृहे, मॉल, जिम, क्रीडासंकुले 
- अत्यावश्यक सेवा वगळता इतर नागरिकांना रात्री 7 ते सकाळी 7 संचारबंदी 
- ज्येष्ठ नागरिक, गर्भवती आणि दहा वर्षांखालील मुले यांनी घरातच राहावे. केवळ अत्यावश्यक गरजा आणि वैद्यकीय कारणासाठी बाहेर पडता येईल. 
- सर्व धार्मिक स्थळे 
- धार्मिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Tank Tower: मोठी घटना! नागपुरात पाण्याच्या टाकीचा टॉवर कोसळला; ३ जणांचा मृत्यू, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

SSC CGL Tier 1 Result 2025: SSC CGL टियर 1 परीक्षा 2025 चा निकाल जाहीर; पहा कुठे अन् कसा पाहायचा रिजल्ट

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर महापालिका निवडणूक : महायुतीचे खातेवाटप अजूनही गुलदस्त्यात

भारताची जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू स्पर्धेत खेळला; फोटो, व्हिडीओ व्हायरल होताच पाकड्यांचा संताप, खेळाडूवर कठोर कारवाई

Kolhapur Election : ‘विजयी होणाऱ्यालाच तिकीट!’ शिवसेना शिंदे गटाचा ठाम निर्णय; महापालिका निवडणुकीसाठी रणनिती ठरली

SCROLL FOR NEXT