The addict who had been in control during lockdown period became addicted again 
पुणे

व्यसनेही झाली अनलॉक; लॉकडाउनमुळे थांबलेली तलफ पुन्हा वाढली

सकाळवृत्तसेवा

पुणे : लत लागल्याने अगदी जीवनावश्यक झालेल्या तलफेच्या बाबी आता मिळतच नाही. भेटली तरी त्याची अवाच्या-सव्वा किंमत मोजावी लागत आहे. त्यासाठी बाहेर गेल्यावर पोलिसांचा मार खावा लागू शकतो. त्यात कोरोनाने आपल्याला गाठले तर होत्याचं नव्हतं होईल, अशा भीतीने व काही कारणांमुळे लॉकडाऊन झालेली अनेकांची व्यसने आता अनलॉक झाली आहेत. गेली अडीच महिने  स्वतःवर काहीसा ताबा ठेवलेली ही मंडळी आता अगदी बेफाम झाल्यासारखी वागत असल्याचे चित्र पुन्हा पहायला मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
लॉकडाऊनमुळे अगदी सुपारीपासून अंमलीपदार्थ मिळणे मुश्किल झाले होते. तंबाखू, गोवा, गुटका दारु, सिगारेट आणि अंमली पदार्थच्या किंमती दुप्पट ते तिप्पट वाढल्या होत्या. त्यामुळे व्यसनींच्या खिशाला चाट बसत होती. त्यांना व्यसन करणे परवडेना झाले होते. त्यातील काही मंडळींनी लॉकडाऊनच्या संधीचा फायदा घेत सर्व व्यसन बंद करायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी या काळात संयम देखील पाळला. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय देखील खुश झाले होते. मात्र सर्वांचा हा आनंद आणि निर्व्यसनी होण्याचे व्रत जास्त दिवस टिकले नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात व त्यापूर्वी दिलेल्या काही सवलतींमुळे संयम बाळगणारी व अनेक दिवसांपासून वाइन शॉप उघडण्याची वाट पहात असलेली मंडळी दारूच्या दुकानांसमोर रांगेत उभी होती. याबाबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, ''लॉकडाउनच्या काळात व्यसनांचे प्रमाण कमी झाले होते. कारण त्या वस्तू मिळत नव्हत्या आणि बाहेर गेले तर पोलिस व कोरोनाची भीती. मात्र काहींचे व्यसनेतरीही सुरू होती. दारुची दुकाने उघडल्यानंतर लगेच आमच्याकडे ऍडमिशन बाबत फोन यायला लागले. 

पुणे : अपघातास कारणीभूत ठरलेली अष्टापुर येथील 'ती' विहिर बुजवणार

आणि तो पुन्हा सुरू झाला : 
''एक व्यक्ती अशी आहे की, तिला लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच मुक्तांगणमध्ये दाखल व्हायचे होते. मात्र कोरोनामुळे आम्ही ऍडमिशन बंद केले होते. त्यामुळे संबंधित व्यक्तीला आमचे समुपदेशक फोनवरच मार्गदर्शन करत होते. अडीच महिने त्या व्यक्तीने दारू पिली नाही. मात्र दारूची दुकाने सुरू होताच त्याने फोन करणे बंद केले आणि पुन्हा दारू पिण्यास सुरवात. त्याची पत्नी त्याला बुधवारी (ता.10) येथे घेऊन आली. आम्ही त्याला दाखल करून घेतले आहे,'' असे पुणतांबेकर यांनी सांगितले.

आळंदीत माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग सुरू पण...
 
''उपलब्धता कमी असली की व्यसनाचे प्रमाण देखील कमी होते, हे लॉकडाऊन काळात पुन्हा सिद्ध झाले आहे. मात्र व्यसनाच्या वस्तू सहजासहजी उपलब्ध झाल्या तर स्वतःवर नियंत्रण राहत नाही. गेली अडीच महिने अशी परिस्थिती नव्हती की, सिगरेटचे पाकिट संपले आहे म्हणून खाली जायचे आणि लगेच घेऊन यायचे. मात्र आता सर्व पुन्हा खुले झाले आहे.''
- मुक्ता पुणतांबेकर, संचालिका, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Interim PM Sushila Karki : नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांचे भारतातील ‘या’ प्रसिद्ध तीर्थक्षेत्राशी आहे खास नाते!

Latest Marathi News Updates : मॅक्स हॉस्पिटलला बॉम्बने उडवण्याची धमकी

Nitin Gadkari : ४०००० कोटींचे उत्पन्न... ७० लाख नोकऱ्या, गडकरींनी दिलेला कमाईचा मंत्र काय आहे?

Viral: वजन कमी करा आणि पैसे मिळवा... प्रसिद्ध कंपनीची अनोखी ऑफर, १८ किलो वजन कमी करणाऱ्याला २,४६,८४५ रुपये दिले

Marriage Registration Issue : सहा महिन्यांपासून विवाह नोंदणी पोर्टल ठप्प; हजारो विवाहांची नोंदणी रखडली

SCROLL FOR NEXT