court esakal
पुणे

Pune Crime : अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांचा जामीन अर्ज फेटाळला

लाच घेतल्याप्रकरणी अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांचा जामीन अर्ज न्यायालयाने शुक्रवारी (ता. १६) फेटाळला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सोलापूर जिल्ह्यातील महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना वाढवून देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांचा जामीन अर्ज न्यायालयाने शुक्रवारी (ता. १६) फेटाळला. सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी याबाबत आदेश दिला.

महसूल विभागातील अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच घेताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ९ जून रोजी अटक केली होती. डॉ. रामोड यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी आणि त्यानंतर २७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी दिले. त्यानंतर त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असलेल्या डॉ. रामोड याने अ‍ॅड. सुधीर शहा यांमार्फत बुधवारी (ता. १४) जामीनासाठी अर्ज केला होता.

बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या जामीनाच्या अर्जास सीबीआयचे वकील अभयराज अरीकर यांनी विरोध केला. डॉ. रामोड याने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे. ते उच्चपदस्थ अधिकारी असून, त्यांना जामीन मंजूर झाल्यास पुरावे गोळा करण्यात अडचणी येतील. तसेच, पुरावे नष्ट करण्यासह साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ. रामोड यांच्या घरझडतीत सहा कोटी ६४ लाखांची रोकड आणि कार्यालयातून एक कोटी २८ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

आरोपीसह त्याच्या कुटुंबीयांच्या नावे विविध स्थावर मालमत्ता असून, त्याची किंमत पाच कोटी ३० लाख रुपये आहे. त्याच्या कार्यालयातील कागदपत्रे अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. जामीन दिल्यास ती कागदपत्रे नष्ट करण्यासह त्यामध्ये छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळावा, अशी विनंती अ‍ॅड. अरीकर यांनी केली. विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा युक्तिवाद ग्राह्य धरत डॉ. रामोड यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT