आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे sakal
पुणे

राजकीय हेतुनं राऊतांवर ईडीची कारवाई : आदित्य ठाकरे

सकाळ डिजिटल टीम

पुणे : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील ईडीची (ED) कारावाई राजकीय हेतुने करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य (Aditya Thackeray) ठाकरे यांना माध्यमांशी बोलताना दिली आहे. तसेच अशा प्रकारे कारवाई करणे म्हणजे देशात लोकशाही उरली आहे की नाही ? असा प्रश्नदेखील आदित्य यांनी यावेळी उपस्थित केला आहे. राजकीय सूडभावनेतून ईडीच्या कारवाया सुरू आहेत. पण शिवसेना अशा कारवायांमुळे थांबणार नाही. आम्ही लढा देऊ, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. धमक्या देऊन कारवाई होऊ लागल्या आहेत हे अतिशय धोक्याचे असून, त्यामुळे देशात आता लोकशाही आहे की नाही यावर विचार करण्याची गरज आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. (Aditya Thackeray On ED Action)

पत्रकारांना सांगून काही फायदा नाही

ईडीच्या कारवाईनंतर राऊत यांनी आपण एक पैशाचाही घोटाळा केलेला नाही, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी समाचार घेतला असून, एक पैशाचा घोटाळा नसल्याचा पत्रकारांना सांगून काही फायदा नाही असा चिमटादेखील चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना काढला आहे. तसेच जर काही घोटाळा नसेल तर, त्यांनी न्यायालयात जावे आणि सिद्ध करावे.

राऊतांच्या एक पैशाच्या घोटाळा नाही अशा विधानावर जनतापण विश्वास ठेवणार नाही असेदेखील पाटील म्हणाले. सत्तेत असल्यापासून आणि आता राऊत वापरत असलेल्या शब्दांचे पुस्तक काढण्याचे काम आपण एकाला दिले आहे. तसेच राऊत वापरत असलेले शब्द महाराष्ट्रातल्या संस्कृतीत बसतात का? असा प्रश्न सामान्य जनतेला विचारणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

राऊत अशाप्रकारे बोलणे हे नवीन नसल्याचे सांगत राऊत आपल्यावर अनेकदा बोलले आहेत. त्यामुळे त्यांना जे संस्कार आहेत त्याप्रमाणे ते बोलतात असेदेखील पाटील यांनी म्हटले आहे. राऊत यांच्यावरील कारवाई जर चुकीची असेल तर, न्याय व्यवस्था काही विकली गेलेली नाही. त्यामुळे या कारावाईविरोधात ते न्यायालयात दाद मागू शकतात, असेदेखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

१ हजार ४८ कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कारवाई -

ईडीने १ हजार ४८ कोटींच्या प्रविण राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली असून अलिबागजवळील किहीमधील ८ भूखंड जप्त करण्यात आले आहेत. प्रविण राऊत हे संजय राऊतांचे स्नेही आहेत. तसेच मुंबईतील एक फ्लॅट देखील जप्त करण्यात आला आहे. आता संजय राऊत देखील ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत.

किरीट सोमय्यांचे संजय राऊतांवर आरोप -

संजय राऊतांचे स्नेही प्रविण राऊत यांनी घोटाळा केला आहे. यामध्ये संजय राऊत देखील सहभागी आहेत. त्यांच्या पत्नीच्या खात्यात देखील पैसा आले आहे, असे आरोप किरीट सोमय्यांनी केले होते. त्यानंतर राऊतांच्या कुटुंबीयांवर ईडीची छापेमारी झाली होती. त्यांच्या मुलीच्या लग्नानंतर ही कारवाई करण्यात आली होती. याबाबत स्वतः संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदींनी गोड बोलून ठाकरेसेनेसाठी खिडकी उघडली? उद्धव ठाकरेंनी भाजपला पाठिंबा देण्याबद्दल दिलं उत्तर

Prajwal Revanna Scandal: 'माझ्या आईवर बलात्कार केला अन् व्हिडिओ कॉलवर मला...'; प्रज्वल रेवन्ना स्कँडलमधील पीडितेने सांगितली आपबीती

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा; सकाळी नऊ वाजेपर्यंत राज्यात 6.45% मतदान

RCB Qualification Scenario : RCB प्ले ऑफमध्ये जाणार? 18 तारखेला, 18 रन्स, 18 ओव्हर्स अन् चेन्नईचा खल्लास खेळ; समजून घ्या गणित

Mohan Agashe: पाच मिनिटं मशीन वाचण्यातच गेली... मतदान केंद्रावर मोहन आगाशे यांनी राजकारण्यांना चांगलंच सुनावलं

SCROLL FOR NEXT