FYJC_Admission 
पुणे

अकरावी अॅडमिशन : ४९ हजार १३ विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; अॅडमिशनसाठी गुरुवारपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक शाळांमधील ऑनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेतील पहिली नियमित गुणवत्ता यादी रविवारी (ता.30) जाहीर करण्यात आली. यात कला, वाणिज्य, विज्ञान आणि एचएसव्हीसी या शाखेतील अभ्यासक्रमासाठी 40 हजार 13 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीतून प्रवेश देण्यात आला, तर सुमारे 19 हजार 575 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी यावर्षी 73 हजार 685 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यातील 68 हजार 72 अर्ज पात्र ठरले आहेत. पहिल्या फेरीत 28 हजार 59 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही. पहिल्या फेरीत जवळपास सहा हजार 702 विद्यार्थ्यांना त्यांच्या दुसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी (ता.31) सकाळी दहा वाजल्यापासून गुरूवारी (ता.3) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत.

विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रोसिड फॉर ऍडमिशन या सुविधेचा काळजीपूर्वक वापर करावा. याबाबत अधिक माहिती www.dydepune.com आणि https://pune11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी दिली.

विद्यार्थी/पालकांसाठी सूचना :
- पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आपल्या लॉगिनमध्ये जाऊन प्रोसिड फॉर ऍडमिशन करणे आवश्‍यक आहे.
- विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत महाविद्यालय अलॉटमेंट होऊनही प्रवेश घ्यावयाचा नाही, त्यांनी ऍडमिशन करण्याची आवश्‍यकता नाही.
- अलॉटमेंटनंतर विद्यार्थ्यांना उर्वरित कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला तसेच यापूर्वी नसलेली कागदपत्रे उपलब्ध असल्यास त्यांनी ती अपलोड करावीत. हे ही अपलोड ऑप्शनल असेल.
- ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेली नाही त्याचा अर्थ विद्यार्थ्यांचा पसंतीक्रम योग्य नसणे अथवा कट-ऑफ त्या विद्यार्थ्यांच्या गुणासोबत मॅच करत नसेल.
- पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे.
- प्रथम पसंतीक्रम मिळूनही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही अथवा प्रवेश नाकारला, तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये संधी दिला जाणार नाही. त्यांना विशेष फेरीपर्यंत थांबावे लागेल.
- विद्यार्थ्यांना घेतलेला प्रवेश रद्द करायचा असल्यास तशी विनंती त्यांनी संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयास करावी आणि आपला प्रवेश रद्द करून घ्यावा.
- घेतलेला प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील नियमित फेऱ्यांसाठी प्रतिबंधित करण्यात येतील. अशा विद्यार्थ्यांना विशेष फेरीपर्यंत थांबावे लागेल.

पहिल्या फेरीत शाखानिहाय प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या : 

शाखा प्रवेश क्षमता पात्र झालेल्या अर्ज प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या
कला 12,614 6,353 4,332
वाणिज्य 33,336 28,798 16,223
विज्ञान 34,179 31,792 18,643
एचएसव्हीसी 3,976 1,129 815
एकूण 84,105 68,072 40,013

पहिल्या फेरीत बोर्डनिहाय मिळालेले प्रवेशाची संख्या :

बोर्ड पात्र अर्जाची संख्या पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या
एसएससी 58,564 34,700
सीबीएसई 6,661 3,751
आयसीएसई 2,274 1,306
आयबी 18 7
आयजीसीएसई 70 36
एनआयओएस 380 166
अन्य बोर्ड 105 47

प्राधान्यक्रमानुसार मिळालेले ऍलॉटमेंट :

प्राधान्यक्रम कला वाणिज्य विज्ञान एचएसव्हीसी एकूण 
1 2,408 7,626 8,789 752 19,575
2 652 2,881 3,128 41 6,702
3 374 1,745 2,038 17 4,174
4 296 1,157 1,385 2 2,840
5 240 882 1,015 1 2,138

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT