पुणे

इंजिनिअरींगसह सर्व अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार

ब्रिजमोहन पाटील

पुणे : सीईटी सेल मार्फत घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षांचे निकाल पाच डिसेंबर पर्यंत जाहीर केले जातील. तसेच या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया प्रवेश डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चालू होईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'कोरोना'मुळे इंजिनीअरिंग, फार्मसी एग्रीकल्चर यांची एमएचटी-सीईटी तसेच विधी, आर्किटेक्टर, हॉटेल मॅनेजमेंट, बीपीएड, एमएड यासह इतर सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक कोलमडून गेले होते. या परीक्षा अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्यभर घेण्यात आल्या. मात्र, त्यापैकी केवळ हॉटेल मॅनेजमेंट आणि आर्किटेक्चर या सीईटी निकाल आॅक्टोबर महिन्यात जाहीर झाले. तर एमबीए सीईटीचा निकाल हा मे महिन्यात जाहीर करण्यात आला आहे. 

एमएचटी-सीईटी झाल्यानंतर त्याचा निकाल लगेच लागेल अशी अपेक्षा होती. मात्र, मराठा आरक्षणामुळे सीईटी सेल कडून कोणत्याही परीक्षेचा निकाल जाहीर केला नाही. राज्य सरकारने एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. त्यानंतर राज्यातील खोळंबलेली प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होणार आहे. मात्र, अद्याप उच्च शिक्षणातील व्यावसायिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेले नसल्याने याकडे पालक व विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत. एमएचटी- सीईटीचा निकाल नोव्हेंबरच्या शेवटी लागण्याची शक्यता अाहे. 

सीईटी परीक्षांच्या निकालाबाबत व प्रवेशाबाबत स्पष्टता येण्यासाठी शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट केले आहे. यामध्ये "राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्व प्रवेश परीक्षांचे निकाल ५ डिसेंबर पर्यंत सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल, अशी माहिती दिली आहे". त्यामुळे सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एका पक्षाकडून निवडणूक जिंकली नंतर पक्षांतर... आता निवडणुकीचा खर्चही वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रासह निवडणूक आयोगाला नोटीस

Koyna Dam Project: कोयनासाठी पाच जीवांचे बलिदान; पेठवडगावातील कोरवी कुटुंबाच्या पदरी उपेक्षाच

Donald Trump New Tariffs : ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब; भारतासह १६ देश अमेरिकेच्या निशाण्यावर, व्यापार कराराला धक्का बसण्याची शक्यता

Vijay Government Takes Action: विजय सरकारची आमदाराविरुद्ध कारवाई; महिला जिल्हाधिकाऱ्यांना अश्लील संदेश पाठविल्याप्रकरणी गुन्हा

Maharashtra Education News: मोठा निर्णय! आता ‘खासगी’ शाळांमध्ये लॉटरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश; खासगी शाळांची थांबणार मनमानी; प्रवेशासाठी वयोमर्यादाही निश्चित

SCROLL FOR NEXT