kendriy vidyalaya 
पुणे

केंद्रीय विद्यालयातील प्रवेशासाठी एक एप्रिलपासून ऑनलाइन नोंदणी होणार सुरू

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय विद्यालयामधील इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. देशभरातील केंद्रीय विद्यालयामध्ये 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी एक एप्रिलपासून ही ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे. तर इयत्ता दुसरी आणि त्यापुढील इयत्तांसाठी नोंदणी प्रक्रिया आठ एप्रिलपासून ऑफलाइन पद्धतीने सुरू होईल. 
इयत्ता पहिलीसाठी ऑनलाइन नोंदणी एक एप्रिल 2021 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. ही नोंदणी प्रक्रिया 19 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी इयत्ता पहिलीच्या केंद्रीय विद्यालयांमध्ये ऑनलाइन प्रवेशासाठी अधिकृत ॲन्ड्रॉईड मोबाईल ॲपद्वारे देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती केंद्रीय विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

हेही वाचा - कात्रज स्माशानभूमीत होतेय मृतांच्या नातेवाईकांची वारेमाप लूट!
तर इयत्ता दुसरी आणि त्यापुढील इयत्तांसाठी प्रवेश घेण्यासाठी 8 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत ऑफलाइन पद्धतीने संबंधित केंद्रीय विद्यालयातील उपलब्ध जागांच्या आधारे नोंदणी करता येणार आहे. सर्व इयत्तांसाठी वयाची गणना 31 मार्च 2021 रोजीपर्यंत ग्राह्य धरली जाईल. जागांचे आरक्षण केव्हीएस प्रवेश मार्गदर्शक सूचनांनुसार असणार आहे. याबाबत सविस्तर माहिती संबंधित संकेतस्थळावर पाहता येणार आहे. 

प्रवेशाचा तपशील:
- प्रवेशाची सविस्तर माहिती संकेतस्थळ : https://kvsonlineadmission.kvs.gov.in 
- इयत्ता पहिली : ऑनलाइन नोंदणीचा कालावधी - 1 ते 19 एप्रिल 
- इयत्ता दुसरी आणि त्यापुढील इयत्ता : ऑफलाइन नोंदणीचा कालावधी : 8 ते 15 एप्रिल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT