पुणे

पुण्यात झिकाचा धोका! 4 महिने गर्भधारणा टाळण्याचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा

खळद : झिकाचा संसर्ग झाल्यावरती त्यापासून जास्त धोका हा गरोदर महिलेला व होणाऱ्या नवजात बाळाला होण्याची शक्यता वैद्यकीय विभागाच्यावतीने व्यक्त केल्यानंतर बेलसर (ता.पुरंदर) येथे किमान चार महिने महिलांनी गर्भधारणा टाळण्याचा सल्ला वैद्यकीय अधिऱ्नयांकडून, प्रशासनाकडून दिला गेला आहे.

बेलसर येथे राज्यातील पहिला झिका पाॅझिटीव्ह रुग्ण आढळल्याने राज्य व केंद्र सरकारने यांची गंभीर दखल घेत वेगवेगळ्या वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येथे येऊन भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला आहे व याला यशही आले आहे

याबाबत तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, झिकाचा संसर्ग हा दूषित एडीस डास चावल्याने होतो. रक्ताच्या देवाण घेवाणीतून अथवा स्त्री-पुरूष संबंधातून झिकाचा संसर्ग होतो. झिकाचा संसर्ग झाल्यावर काही वेळेस काही लक्षणे दिसत नाहीत मात्र, पुरुषांच्या वीर्यात साधारणत: चार महिने झिकाचा विषाणू जीवंत राहू शकतो. त्यामुळे अशा पुरूषापांसुन झालेली गर्भधारणा झिका संसर्ग ग्रस्त असू शकते. यामुळे किमान तीन महिने गर्भ धारणा टाळावी. पुरुषांनी शक्यतो संभोग टाळावा किंवा सुरक्षित संभोग करावा असे वैद्यकीय विभागाचे म्हणणे आहे. यासाठी येथील आरोग्य विभागाकडून गर्भधारणा टाळण्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकार व राज्य सरकार कडून मिळालेल्या सुचनेनुसार येथे ग्रामपंचायत व बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यावतीने डासांची उत्पत्तीचे ठिकाणे नष्ट करण्यात आली तर गावात जनजागृतीसाठी भोंगा गाडीचा वापर करून दारोदारी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. गावात सर्व ठिकाणी फवारणी केली, गावातल्या २४ गरोदर महिलांना मच्छरदाणी आणि डास प्रतिबंधक मलम देण्यात आला,या महिलांचे रक्ताचे नमुने तपासले असल्याचे उपसरपंच धीरज जगताप यांनी सांगितले.

''झिका संसर्गातून झालेल्या गर्भधारणेतून गर्भवती महिलेच्या जन्मलेल्या बाळाच्या मेंदूची पूर्ण वाढ होत नाही, डोक्याचा आकार कमी होतो, वेळेच्या आधी संबधित महिला बाळंत होवू शकते, तसेच उपजत बाळाचा मृत्यू देखील होवू शकतो.''

- डॉ. उज्वला जाधव , तालुका वैद्यकीय अधिकारी पुरंदर.

''आज रोजी बेलसर येथे डेंगू, चिकनगुनियाचे पेशंट कमी झाले आहेत तर ज्या महिलेला झिकाचा संसर्ग झाला होता त्या महिलेचे एन आय व्ही संस्थेकडून पुन्हा रक्ताचे तपासण्यात आले याचा अहवाल आला असुन तिचे डेंगू, चिकनगुनिया व झिका असे तीनही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर गावात एकही नवीन झिका सदृश रुग्ण निदर्शनास नाही . तसेच आज शुक्रवारी केलेल्या सर्वेक्षणानुसार बेलसर व परिसरातील गावांमध्ये एकही तापाचा पेशंट आढळून आला नाही, तसेच डासांच्या आळ्याही आढळल्या नाहीत. ''

- डॉ.भरत शितोळे, वैद्यकीय अधिकारी बेलसर प्राथमिक केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, चार जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT