corona.gif 
पुणे

पुण्यातील १५ कंटेन्मेंट झोनबाबत होणार 'हा' महत्त्वाचा निर्णय

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यात कोरोना पसरत असला तरी; बाधित भागांतील १५ परिसरात गेल्या काही दिवसांत नवे रुग्ण आढळले नाहीत आणि जुने रुग्ण बरे झाली आहेत. त्यामुळे हे परिसर आता बाधित क्षेत्रातून वगळण्यात येणार असून, रुग्ण सापडून त्यांची संख्या वाढलेल्या पाच ते सहा परिसरांचा सूक्ष्मबाधित क्षेत्रांत समावेश होणार आहे. याबाबतचे आदेश लवकरच काढले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बाधित क्षेत्र आणि त्याबाहेरील हद्दीत आता सुरू असलेली दुकानेच सुरू राहणार आहेत. नव्याने काही व्यवहार सुरू करण्याच्या हालचाली तुर्तास तरी नाहीत, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. शहरातील गेल्या पंधरा दिवसांतील कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली. त्यात विशेषतः बाधित क्षेत्र कमी करण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.

लॉकडाऊनच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात बाधित क्षेत्र कमी करून त्याठिकाणी नागरिकांना सवलती देण्यात येत आहेत. विशेषतः नागरिक आणि वाहनांच्या वाहतुकीसाठी रस्ते मोकळे करण्यासोबतच जीवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडली गेली आहेत. रुग्ण संख्या पाहून बाधित क्षेत्र कमी-अधिक केला जात आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यांत बाधित क्षेत्र कमी करून त्याठिकाणी नागरिकांना सवलती देण्यात येत आहेत. विशेषत: नागरिक आणि वाहनांच्या वाहतुकीसाठी रस्ते मोकळे करण्यासोबतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडली गेली आहेत.

रुग्ण संख्या पाहन बाधित क्षेत्र कमी-अधिक केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या ६६ पैकी १५ बाधित क्षेत्र कमी करून त्याठिकाणचे किमान व्यवहार सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. तर, याच काळात काही परिसरांत रुग्ण वाढण्याची आकडेवारी आहे. त्यामुळे अशा पाच परिसरांत नव्याने बंधने लादली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS: पाकची उडाली झोप! 'ब्रिक्स'च्या घोषणापत्रात दहशतवादावर सडकून टीका; पहलगाम हल्ल्याचा उल्लेख

बाळाच्या संगोपनासाठी घरात आली मंगल; पण नंतर बदललं सगळंच! ‘अडकित्ता’मध्ये नेमकं काय घडलं? वाचा रिव्ह्यू

Pune Road Inspection: गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात रस्ते दुरुस्तीचा बोजवारा; मिरवणूक मार्गांवर खड्डे, धोकादायक चेंबर अन् फुटपाथ

Palghar Bus Tragedy: शिवशाही बसच्या डिकीचे झाकण उघडताच शेतकरी सुभाष पागींचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Marathi News Live Updates: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची बाजारपेठेत गर्दी

SCROLL FOR NEXT