Pune_Wholesale_Market 
पुणे

तब्बल १०० दिवसांनंतर खुली होणार पुण्यातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ; पण 'या' पद्धतीने!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : चॉकलेट-गोळ्यांपासून ते प्लॅस्टिकच्या घरगुती वापराच्या वस्तू आणि खेळण्यापर्यंतच्या वस्तू संपूर्ण शहरासह पश्‍चिम महाराष्ट्राला पुरवठा करणारी रविवार पेठेतील बाजारपेठ तब्बल शंभर दिवसानंतर खुली होणार आहे. गुरुवारपासून (ता.१८) 'पी वन- पी टू' या पद्धतीने सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत या बाजारपेठेतील दुकाने खुली करण्याचा निर्णय बुधवारी (ता.१७) घेण्यात आला. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 23 मार्चपासून लॉकडाऊन लागू केले. त्यानंतर रविवार पेठ, शुक्रवार पेठ, भोवरी आळी, कापडगंज भागातील व्यापारी बाजारपेठ बंद झाली होती. घरगुती वापरातल्या प्लास्टिकच्या वस्तू, झाडू, पावसाळ्यात घरावर टाकावयाचे प्लॅस्टिकचे कागद, चॉकलेट, गोळ्या, प्लॅस्टिकची शोभीवंत झाडे, टिकल्या, रेनकोट, छत्र्या, ज्वेलरी, वह्या- पुस्तके, स्टेशनरी साहित्य, कापड, गांधी टोप्यापासून अनेक वस्तूंची ही घाऊक बाजारपेठ आहे. या पेठेतून शहराबरोबरच पुणे जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात मालाचा पुरवठा होतो.

मात्र, लॉकडाऊनमुळे या वस्तूंची पुरवठा साखळी खंडित झाली होती. या पेठा कंन्टेमेन्ट झोनमध्ये येत असल्याने ऍनलॉक एकमध्ये येथील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. ती द्यावी, अशी मागणी तेथील व्यापारी गेल्या काही दिवसांपासून करीत होते. मध्यंतरी शासनाकडून नियुक्त करण्यात आलेले सौरभ राव यांनी त्या भागात भेट देऊन पाहणी देखील केली होती. ही बाजारपेठ खुली करण्याबाबतचे अधिकार महापालिकेने पोलिसांना दिले होते.

त्यानुसार बुधवारी पोलिस आणि तेथील व्यापाऱ्यांची एकत्रित बैठक झाली. त्यामध्ये दुकाने सुरू करण्यासंदर्भात एकमताने निर्णय घेण्यात आला, अशी माहिती तेथील पुणे शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी सांगितले. ते म्हणाले, 'पी वन- पी टू' या पद्धतीने उद्यापासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत ही दुकाने सुरू करण्यात येणार आहेत.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporators Not Reachable : विधानपरिषदेचे राजकारण तापलं! काँग्रेसचे ५० ते ६० नगरसेवक नॉट रीचेबल, भाजप आमदाराचा दावा

12 Years of PM Modi नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा पेट्रोल-डिझेलचे दर किती होते?

Blood Group Stroke Risk: ‘या’ रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा जास्त धोका? वाचा शास्त्रज्ञांचं नेमकं म्हणणं काय

Ganga Dussehra: वर्षातून एकदा होतो गंगा आणि नर्मदेचा संगम! काय आहे 'भयडा प्रसाद' आणि त्याची रेसिपी?

Mumbai: महापालिका जागा सील करू शकत नाही, थकीत मालमत्ता कर वसूलीवर न्यायालयाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT