after 40 year Man arrested under crime of Adulteration of petrol in Pune 
पुणे

पेट्रोल भेसळ करणाऱ्या आरोपीस 40 वर्षांनी अटक; सध्या 'तो' सरपंच होता ! 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पेट्रोलमध्ये भेसळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला कामगार आरोपी तब्बल 40 वर्ष पोलिसांना गुंगारा देत होता. या प्रदीर्घ कालावधीत आरोपीने एका गावच्या सरपंचपदापर्यंत मजल मारली. 40 वर्षाने का होईना, स्वारगेट पोलिसांना त्याचा सुगावा लागला. अखेर पोलिसांनी त्यास अटक केले. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

विजय मुगूटराव गरूड (वय 61, रा. भाबवडे, न्हावी,भोर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कात्रज परिसरातील लडकत पेट्रोल पंपावर 1980 मध्ये आरोपी विजय गरूड हा कामगार म्हणून काम करत होता. संबंधीत पेट्रोल पंपालर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत पेट्रोलमध्ये भेसळ असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार, पेट्रोलपंप मालक बाळासाहेब लडकत, गरूड व अन्य एका कामगाराविरुद्ध जीवनावश्‍यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, लडकत यांचा मृत्यू झाला. 

कोण आहेत न्या. मुरलीधर? ज्यांची रातोरात बदली झाली?

या प्रकरणाचा तपास करीत असताना गरुड हा भोर तालुक्‍यातील भाबवडे गावचा सरपंच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, स्वारगेट पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शब्बीर सय्यद यांच्या पथकाने गरुडला ताब्यात घेतले. त्याच्याकडे वयाबाबत विचारणा केली. तेव्हा, त्याने आपले वय 50 सांगितले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याच्याकडील ओळखपत्र मागितले. त्यावरुन तो 61 वर्षांचा असल्याचे उघड झाले. तसेच तो 1980 यावर्षी पेट्रोल पंपावर कामाला असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. न्यायालयाने त्याच्याविरुद्ध चार ते पाच वेळा अजामीनपात्र वॉरंट काढले होते. मात्र तो न्यायालयात हजर राहीला नाही. तसेच त्याने जाणीवपुर्वक चुकीचा पत्ता दिल्याने पोलिसांनाही त्याच्यापर्यंत पोचणे अवघड जात होते. अखेर राजगड पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : आजचा दिवस प्रत्येक हिंदू आणि मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुढीपाडव्यानिमित्ताने वक्तव्य

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Panchang 19 March 2026: आजच्या दिवशी बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT