Trupti Desai on Gautami Patil News Esakal
पुणे

Gautami Patil News: गौतमीला दिलेल्या मानधनामुळे तुमच्या पोटात का दुखतयं? तृप्ती देसाईं भडकल्या

गौतमी पाटीलचं उदाहरण देत समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी भाष्य केलं

सकाळ डिजिटल टीम

Gautami Patil News: राज्यात अनेक ठिकाणच्या जत्रा-यात्रा चालू झाल्या आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी यात्रे निमित्त किर्तन, तमाशा आयोजित करतात. राज्यात गौतमी पाटीलला प्रचंड प्रतिसाद आहे. तिच्यावर अनेकांनी टीका केल्या तिचा विरोध केला.

अशातच प्रसिध्द कीर्तनकार इंदुरीकर महाराजांची भर पडली आहे. गौतमी पाटीलचं उदाहरण देत समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी भाष्य केलं. ते आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे कीर्तन सांगत होते.

यावेळी ते म्हणाले गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख आणि आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही असं विधान इंदुरीकरांनी केलं आहे. आम्ही किर्तनाला पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो.(Latest Marathi News)

मात्र गौतमीच्या तीन गाण्यांसाठी तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात हाणामारी, राडा होतो. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. असं इंदुरीकर महाराज कीर्तनात म्हणाले होते.

त्यानंतर आता गौतमी पाटीलला दिलेल्या मानधनामुळे तुमच्या पोटात का दुखतयं? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी कीर्तनकार इंदुरीकर यांना केला आहे.(Marathi Tajya Batmya)

महिला आपल्यापुढे गेलेली बघवत नाही म्हणूनच इंदुरीकरांनी गौतमी पाटीलवर टीका केल्याचं मत तृप्ती देसाई यांनी व्यक्त केलं आहे. इंदुरीकर तुमचा ब्लॅकचा पैसा कुठे जातो, असा सवाल देसाई यांनी इंदुरीकरांना केला आहे.

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर तृप्ती देसाईंनी सडकून टीका केली आहे. इंदुरीकर आणि गौतमी पाटील प्रकरणात आता भूमाता ब्रिगेडने देखील उडी घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी इंदुरीकर यांनी कीर्तन करताना "आम्हाला ५००० रुपये मानधन द्यायला पैश्याचा उधळण म्हणतात आणि गौतमी पाटीलच्या ३ गाण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात" अशा आशयाचे विधान इंदुरीकर यांनी केले होते. यावर आता अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT