पुणे

आईचा खून केल्या नंतर वडिलांना ही जीवे मारण्याचा प्रयत्न...

आईवरती मुलानेच लोखंडी कोयत्याने वार करुन जीव मारल्याची घटना

सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : जमीन वाटून देत नाही, मागेल तेवढे पैसे देत नाही, तुम्ही माझे आई -वडील नसल्याच्या कारणावरुन आईवरती मुलानेच लोखंडी कोयत्याने वार करुन जीव मारल्याची घटना इंदापूर तालुक्यातील काझडमध्ये घडली. तसेच वडिलावरती कोयत्याने वार करुन त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न केला.या घटनेमध्ये वडिलांच्या दोन्ही हाताची दोन बोटे तुटली आहेत. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी मुलावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमध्ये अलका पांडुरंग नरुटे ( वय -55 रा. काझड) या महिलेच्या डोक्यात तसेच अंगावर लोखंडी कोयत्याने सपासपा वार करुन खून करण्यात आला. याप्रकरणी पोेलिसांनी अमित पांडुरंग नरुटे (वय- ३१, वर्षे रा.सिधोबाची वस्ती, काझड) याच्यावर गुन्हा दाखल केला असून पांडुरंग बाबुराव नरुटे (वय ६०) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पांडुरंग नरुटे यांची काझड परीसरामध्ये शेती व घर आहे. रविवार (ता.२) रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास काझड जवळील सिधोबाची वस्ती येथे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अमित याने आईला शेतामध्ये पंप सुरु करण्यासाठी जायाचे असल्याचे सांगून शेतामध्ये घेवून गेला. व उसाच्या शेतामध्ये कोयत्याने आईच्या डाेक्यामध्ये तसेच शरीरावरती वार करुन निघृण खून केल्याची घटना घडली.

आईला जीव मारल्यानंतर वडिल पांडुरंग यांना जीव मारण्यासाठी घरी आला होता. यावेळी वडिल फोन वरती मुलाची विचारपूस करीत होते. वडिलांनाही शेतातील पाईप फुटला असून पाईप जोडण्यासाठी आपण दोघे जावू असे म्हणत होता. मात्र वडिलांना संशय आल्याने त्यांनी घराच्या बाहेर जाण्यास नकार दिला. यावेळी वडिल फोनवरती बोलत असल्याने अमित ने वडिलांच्या डाव्या हाताच्या दंडावर व हातावरती वार केला. यामध्ये त्यांची दोन्ही हाताची बोटे तुटली आहेत. दरम्यानच्या काळामध्ये फोन सुरु असल्याने शेजारच्या नागरिकांना प्रकार कळाल्याने त्यांनी तातडीने पांडुरंग नरुटे यांचे घर गाठले. याप्रकरणी पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT