पुणे

तब्बल नऊ महिन्यांनंतर अखेर उचलले बाक

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेच्या शिक्षण विभागाने तब्बल नऊ महिन्यांनंतर तत्परता दाखवीत नेहरूनगरमधील भांडारातून हजारो बाकं उचलले आहेत. संबंधित पुरवठाधारकाने मागणीनुसार शाळांवर बाक पोच करण्यास अखेर सुरुवात केली. ‘हजारो बाक धूळ खात’ या मथळ्याखाली ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन प्रशासनासह पुरवठादाराला जाग आली आहे.

महापालिकेच्या भांडार विभागाने काही महिन्यांपूर्वी ७१ लाख ४० हजारांची सुमारे एक हजार १६० शालेय बाक खरेदी केले. त्यानंतर हे बाक शाळांमध्ये पोच करण्याऐवजी नऊ महिन्यांपासून पूर्वीच्या नेहरूनगर मध्यवर्ती भांडार विभागात धूळ खात पडून होते. अनेक शाळांमधील वर्गांचा आकार लहान आहे. तेथे बाकांची गरज नसल्याचे मुख्याध्यापकांनी प्रशासनाला कळविले होते. तरी खरेदी करण्यात आली होती.

याविषयी ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर भांडार विभाग आणि शिक्षण विभागाने हालचाल केली. संबंधित पुरवठाधारकाला बोलावून घेतले. त्याला मागणीनुसार शाळांवर बाकवाटप करण्यास सांगितले. शिक्षण विभागानेही आडेवेढे न घेता नेहरूनगरच्या भांडारपाल रवींद्र शीलवंत यांच्या डिमांड चलन, मागणी तक्ता व शाळांची यादी पाठवली. त्यानंतर सकाळीच बाक उचलण्यास सुरुवात केली. शीलवंत म्हणाले, ‘‘जोपर्यंत शिक्षण विभागाकडून मागणी चलन येत नाही, तोवर आम्ही गोदामात आलेले साहित्य हलवू शकत नाही.’’

दरम्यान, ना पुरवठाधारकाने बाक वाटप केले, ना प्रशासनाने, तरीदेखील संबंधितांचे बिल पास केले. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी, ठेकेदारांवर कडक कारवाई करावी, अशी तक्रार दीपक खैरनार यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT