Pune Bypoll Election
Pune Bypoll Election Esakal
पुणे

Pune Bypoll Election : पुण्यात पोटनिवडणुकीसंबधी पोस्टरनंतर आता ऑडिओ क्लिप व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील कसाब आणि चिंचवड पोटनिवडणूक राज्यभयर चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या काही दिवसात पुण्यात बॅनरची चर्चा सुरू होती. आता या पोटनिवडणुकीच्या संबधी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत बॅनरबाजी सुरू असताना निवडणुकीचा 15 दिवस प्रचार करा आणि 7 हजार रुपये मिळवा, अशी एक ऑडिओ क्लिप सध्या पुण्यात चर्चेचा विषय बनली आहे.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराआधीपासूनच बॅनर झळकले आहेत. मुक्ता टिळक यांच्याजागी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली त्यानंतर ब्राह्मण समाजाचा उमेदवार डावलला म्हणून याआधी कसब्यात एक बॅनर लागलं होतं, त्यानंतर ही बॅनरबाजी सुरू आहे.

तर चिंचवडमध्येही शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या राहुल कलाटेंनी अपक्ष अर्ज भरला आहे त्यामुळे ही निवडणुकही चर्चेचा विषय बनली आहे. मविआचे नाना काटे विरुद्ध भाजपच्या अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटेंमध्ये सामना होणार आहे. उमेदवारी जाहीर होण्याआधी राहुल कलाटे मविआचे उमेदवार असण्याची चर्चा होती. मात्र मविआकडून नाना काटेंना तिकीट दिल्यामुळे राहुल कलाटेंनी अपक्ष अर्ज भरला आहे.

ठाकरे गटाकडून कलाटेंना अर्ज माघारी घेण्याची विनंती करण्यात आली होती. पण हे प्रयत्न अयशस्वी ठरले. म्हणून कलाटेंविरोधात बॅनरबाजी झाल्याची चर्चा सुरू आहे. तर राहुल कलाटे यांच्यावर कारवाईचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

तर दुसरीकडे कसब्यात बॅनरबरोबर एक व्हायरल ऑडिओ क्लिपही चर्चेत आली आहे. एक महिला फोनवरुन लोकांना प्रचारासाठी ७ हजार रुपये देण्याचं आवाहन करत आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमधील संबंधित महिला कोणत्या पक्षाची आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.मा त्र तिनं सारसबाग भागातल्या कार्यालयात येण्यासाठी सांगितल्यामुळे सारसबाग भागात कोणत्या पक्षाचं कार्यालय आहे, याची चर्चा पुण्यात सुरू झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT