Kasba By Election Result 
पुणे

Kasba By Election Result : विजयानंतर रवींद्र धंगेकर केसरीवाड्यात! टिळक कुटुंबीयांचे मानले आभार...

सकाळ डिजिटल टीम

Kasba By Election Result : रवींद्र धंगेकर यांनी कसब्यात भाजपचा सुपडा साफ केला आहे. भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये कसब्यात अत्यंत चुरशीची लढाई झाली. टिळक कुटुंबात भाजपने टिकीट न देता भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे कसब्यात भाजपमध्ये नाराजीचे वातावरण होते. 

दरम्यान आज झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीचे नेते रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. गेल्या ३० वर्षापासून बालेकिल्ला असणाऱ्या भाजपचा धंगेकरांनी सुपडा साफ केला आहे. त्यामुळे शहरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. 

विजय मिळाल्यानंतर रवींद्र धंगेकर केसरीवाड्यावर गेले आहेत. धंगेकर यांनी केसरी वाड्याच्या गणपतीच दर्शन घेतलं आहे. यावेळी त्यांनी शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांची देखील भेट घेतली. 

कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा धंगेकर यांनी टिळक कुटुंबीयांचे आशीर्वाद घेतले होते. आज निवडून आल्यावर सुद्धा धंगेकर यांनी तत्काळ केसरीवाड्यावर हजेरी लावली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT