after written assurance of authorities shirsai water issue strike in Undavadi called off
after written assurance of authorities shirsai water issue strike in Undavadi called off Sakal
पुणे

Baramati News : अधिकार्यांच्या लेखी आश्वासनानंतर उंडवडीतील चक्री उपोषण मागे

विजय मोरे

उंडवडी : उंडवडी सुपे (ता. बारामती ) येथे शिरसाईच्या पाण्यासाठी सुरु असलेले चक्री उपोषण दुसर्या दिवशी खडकवासल्याच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुर्हाडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

खडकवासला कालव्यातून शिर्सुफळ तलावात २६ सप्टेंबरला पाणी सोडणात येईल. असे लेखी शेतकर्यांना मिळाल्याने येत्या चार - पाच दिवसात शिरसाईचे आवर्तन लाभार्थी गावात सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

खडकवासला कालव्यातून शिसुर्फळ तलावात पाणी सोडून शिरसाईच्या लाभार्थी गावांना सोडण्यात यावे, या मागणीसाठी उंडवडी सुपे येथील संत तुकाराम महाराज पालखी तळावर १४ गावातील शेतकर्यांचे काल (ता. २२) पासून चक्री उपोषण सुरु झाले होते. यामध्ये १०० हून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.

आज उपोषणाच्या दुसर्या दिवशी सकाळी जिल्हा परिषदेचे सदस्य भरत खैरे यांनी उपोषण स्थळाला भेट दिली व शेतकर्यांच्या उपोषणाला पाठींबा दिला. तसेच कारखेलच्या सरपंच वैशाली रणसिंग व माजी उपसरपंच धनश्री भापकर यांनीही उपोषणाला पाठींबा दिला. तसेच सुपे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी येवून उपोषणकर्त्यांची विचारपूस केली.

यानंतर बारामतीचे तहसिलदार गणेश शिंदे व गटविकास अधिकारी अनिल बागल यांनी उपोषणस्थळी भेट देवून उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी तहसिलदार शिंदे यांनी संबधित अधिकार्यांना संपर्क करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.

यावेळी खडकवासलाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुर्हाडे यांनी तहसिलदार शिंदे यांच्या फोनला सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर अधिकारी व उपोषणकर्ते यांची एकत्रित येवून चर्चेसाठी एकत्र येण्याचे तहसिलदार शिंदे यांनी नियोजन केले होते.

त्यानुसार दुपारी ३ च्या दरम्यान कार्यकारी अभियंता श्वेता कुर्हाडे यांनी उपोषणस्थळी येवून तहसिलदार शिंदे यांच्या समवेत शेतकर्यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली. यावेळी येत्या मंगळवारी २६ सप्टेंबरला खडकवासला कालव्यातून शिर्सुफळ तलावात पाणी सोडण्यात येईल.

असे शेतकर्यांना लेखी दिले. तसेच इतर मागण्यांसाठी आमच्याकडून सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी खडकवासलाचे उपभियंता शंकर बनकर, शिरसाईचे स्थापत्य अभियंत्रिकी अमोल शिंदे आदी उपस्थित होते. लेखी पत्रानंतर शेतकर्यांनी चक्री उपोषण मागे घेतले.

याबाबत शेतकरी सुहास काळे व मधुकर भोसले म्हणाले, "आमच्या आंदोलनाला यश आले असून येत्या चार- पाच दिवसात शिरसाईचे आवर्तन मिळणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे १४ गावांच्या एकीचे दर्शन या आंदोलनात घडले. यापुढेही शिरसाई योजनेतील पाईपलाईन ,योजना सौरऊर्जा आदी बाबींसाठी आम्ही सर्वजण एकत्र येवून पाठपुरावा करणार आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुख्यमंत्री शिंदेंच्या गडात सर्वात कमी मतदान? जाणून घ्या ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT