Agitation at Pune University after the meeting by Education Minister Uday Samant 
पुणे

शिक्षणमंत्री सामंत यांच्या बैठकीनंतरही पुणे विद्यापीठात आंदोलन; चर्चा निष्फळ

ब्रिजमोहन पाटील

पुणे : महाराष्ट्रातील अकृषीविद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी २४ सप्टेंबर पासून लेखणी बंद आंदोलन सुरू केले, त्यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी सकाळी  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी  ऑनलाईन बैठक घेतली. मात्र बैठक निष्फळ ठरली. बैठकीनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुख्य इमारतीसमोर शेकडो कर्मचारी एकत्र येत मागण्यांसाठी आंदोलन केले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महाराष्ट्रातील १३ विद्यापीठातील कर्मचारी, अधिकारी यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, आश्वासित प्रगती योजना पुन्हा सुरू करावी, विद्यापीठ, महाविद्यालयातील रिक्त पदे भरावीत, पाच दिवसांचा आठवडा लागू करा यासह इतर मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी 24 सप्टेंबर पासून राज्यातील अकृषिक विद्यापीठांमध्ये लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये पुणे विद्यापीठातील कर्मचारी सहभागी आहेत. त्याचा फटका परीक्षा विभागातील तयारीला बसला आहे.

आंदोलनाने  विद्यापीठांमधील काम ठप्प झाले आहे, त्यामुळे सोमवारी सकाळी उदय सामंत यांनी अकृषीविद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत आॅनलाईन बैठक घेतली. प्रलंबित मागण्यांवर चर्चा केल्यानंतर विद्यार्थी हितासाठी आंदोलन मागे घेण्याची विनंती सामंत यांनी केली. मात्र, आंदोलन मागे न घेता उलट पुणे विद्यापीठात कर्माचार्यांनी मुख्य इमारती समोर एकत्र येत निदर्शने केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विद्यापीठ शिक्षकेतर सेवक कृती समितीचे उपाध्यक्ष डॉ. सुनील धिवार म्हणाले, " कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात उदय सामंत यांच्यासोबत चर्चा झाली. आम्हाला उच्चशिक्षण संचालकांकडून लेखी आश्वासन मिळणार आहे, त्यावर कृती समितीमध्ये चर्चा केल्यानंतर आंदोलन थांबवायचे कि सुरू ठेवायचे यावर निर्णय घेतला जाईल. यासाठी अजून किमान दोन दिवस लागतील. आम्ही आंदोलन मागे घेतलेले नाही. पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोर सर्व कर्मचारी निदर्शने  करण्यासाठी एकत्र आले आहेत. 


"आज राज्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक संपन्न झाली. या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून यानंतर त्यांना आंदोलन करण्याची गरज भासणार नाही. विद्यार्थी हित लक्षात घेता आंदोलन मागे घेण्याची विनंती केली."
- उदय सामंत, मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

Viral Video: हत्तीच्या बाळाची टरबूज मागण्याची क्यूट अदा, हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मने

Thane Crime: कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ, धक्कादायक आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT