A agitation at Wagholi in Pune today by burning electricity bill 
पुणे

Video : पुण्यात वीज बिल माफीसाठी बोंबाबोंब आंदोलन

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यात आज वाघोली येथे वीज बिल माफीसाठी बोंबाबोंब आंदोलन झाले. ''आधी उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिलेला शब्द पाळावा नंतर उर्जा खाते सोडावे''अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी केली आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सलून दुकानदार व्यावसायिक व्यापारी दुकानदार सहभागी झाले होते.

दुकानदार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांचे बेमुदत सुरू असलेलं साखळी आंदोलन पुण्यात वाघोली येथे झाले. लॉकडाऊनमध्ये घरगुती व छोटे मोठे व्यावसायिक दुकानदारांचे वीज बिल माफ करावे. यासाठीचे आंदोलन लाॅकडाऊन उघडल्यापासून ते आजपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने सुरू आहे.

- Valentine Special: 'फिल माय लव्ह', आर्याची जादू आजही कायम!​

यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून वीज बिले ई-मेलने गोळा करून मंत्रालयासमोर सामुहिक वीज बिलाची होळी करण्यात आली आहे. खांदेपालट झालीच तर या खात्याचे नवीन ऊर्जा मंत्री यांना ट्रक भरून वीज बिलांच्या शुभेच्छा देण्यासाठी जन आंदोलनाची हाक देण्यात आली आहे, असा इशारा सलून अँन्ड पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष व व्यापारी दुकानदार संघटनेचे नेते सोमनाथ काशिद यांनी दिला आहे.

- 'एक हजारों में मेरी बहना है!'; बहीण सरपंच होताच भावानं दिलं मोठं गिफ्ट
 

 काय आहे आंदोलकांच्या प्रमुख मागण्या

१) घरगुती तसेच छोटे मोठे व्यावसायिक दुकानदारांचे व्यापारी दुकानदारांची संपूर्ण वीज बिल माफ करावे.

२) महावितरण कंपनी व ऊर्जा मंत्री यांनी वीज कनेक्शन कट करण्याच्या दिलेल्या ७१ लाख नोटीस माघारी घ्यावी.

३) मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री यांनी वीज बिल माफ करण्याचे दिलेले आश्वासन पाळावे व वीज बिल माफ केल्याची घोषणा करावी.

४) मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री यांनी जनतेच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा करावी व म्हणणे तसेच मागण्या जाणून घ्याव्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सून परतीच्या वाटेवर! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; पुणे-सातारा-कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

करकायदा : ‘एमडीआर’वरील जीएसटी

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

Pune Weather: पुण्यात पुन्हा ढगांची दाटी; पुढील दोन-तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

SCROLL FOR NEXT