AICTE'order to do not force for admission fee 
पुणे

लॉकडाऊनमध्ये कॉलेज फी मधून विद्यार्थ्यांना मिळणार सुटका

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक शुल्क अथवा प्रवेश शुल्क भरण्यासाठी शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांनी तगादा लावू नये, असे स्पष्ट आदेश अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने दिले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
या काळात आणि त्यानंतर परिस्थिती सुरळीत होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्यात येऊ नये, यासंदर्भातील आदेशाचे परिपत्रक तंत्रशिक्षण परिषदेने संकेतस्थळावर अपलोड केले आहे. तसेच या संदर्भातील माहिती संबंधित संस्थांनी आपल्या संकेत स्थळावर द्यावी आणि विद्यार्थ्यांशी ई-मेलद्वारे संपर्क साधून ही माहिती सांगण्यात यावी, असेही तंत्रशिक्षण परिषदेने परिपत्रकात नमूद केले आहे.

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा
 देशातील विविध महाविद्यालयांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये या काळात प्राध्यापक आणि शिक्षकेेतर कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संबंधित लॉकडाऊनच्या काळात प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार अडवून ठेवू नयेत.त्याचप्रमाणे या काळात कोणाला नोकरीवरून काढून टाकू नये, अशाप्रकारचा निर्णय घेतलाअसल्यास तो मागे घ्यावा, अशी स्पष्ट सुचना देखील तंत्रशिक्षण परिषदेने केली आहे. तसेच सध्या सोशल मीडियाचा वापर करून चुकीची माहिती नागरिक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. अशा माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. केवळ केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोग आणि तंत्रशिक्षण परिषद यांच्या अधिकृत संकेतस्थळावर दिली जाणारी माहिती ग्राह्य धरावी. तसेच पंतप्रधान विशेष शिष्यवृत्ती योजना २०२० राबविण्यात विंलब होत आहे. मात्र लॉकडाऊननंतर सर्व यंत्रणा सुरळीत झाल्यावर या योजनेसंदर्भात अद्यायावत माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात येणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण परिषदेच्या परिपत्रकात देण्यात आली आहे.

#Lockdown2.0 : गायत्रीने केले वडिलांचे घरीच केशकर्तन
 लॉकडाऊनचा काळ सध्या वाढविण्यात आला असला, तरी चालू सत्रातील अभ्यासक्रम ऑनलाइन द्वारे सुरु ठेवण्यात यावा तसेच सुधारीत शैक्षणिक कॅलेंडर विद्यापीठ अनुदान आयोग आणि तंत्र शिक्षण परिषदेद्वारे तयार करण्यात येईल. लॉकडाऊनमुळे समर इंटरंशिप पूर्ण करणे शक्य न झालेल्या विद्यार्थ्यांनी घरातून ही इंटरंशिप पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा. या काळात इंटरंशिप पूर्ण न झाल्यास ती डिसेंबर 2020 पूर्ण करता येणार आहे, असेही तंत्र शिक्षण परिषदेने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

SCROLL FOR NEXT