Ajit Pawar Esakal
पुणे

Pune : नव्या व्हेरिएंटसाठी सज्ज; जम्बो सुरूच ठेवणार - अजित पवार

पुण्यातील गायन आणि इतर कार्यक्रमांना 100 टक्के मुभा; डिसेंबरमध्ये भीमथडी जत्रेला परवानगी

सकाळ डिजिटल टीम

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोना (Corona) रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही अतिशय दिलासादायक बाब आहे. मात्र, दक्षिण अफ्रिकेत (South Africa) आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रोम (Omicron) व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि पिंपरी-चिंडवडमधील जंम्बो कोविड (Jumbo Covid Center) रूग्णालय सुरूच ठेण्यात येणार आहे, त्याबाबतचा निर्णय 31 डिसेंबर रोजी घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी दिली. पुण्यात आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.

दरम्यान, शहरातील रूग्णसंख्या कमी होत असल्याने खूल्या जागेतील गायन आणि इतर कार्यक्रमांना देण्यात आलेली 50 टक्के उपस्थितीची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. तसेच डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या भिमथडी जत्रेलादेखील परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या सर्व ठिकाणी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन कारावे लागणार आहे, असे पवार यांनी नमूद केले.

1 डिसेंबरपासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु

पुणे आणि जिल्हातील कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, त्यामुळे 1 डिसेंबरपासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु करणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवला नियमांचे पालन करून परवानगी असणार आहे. डिसेंबरच्या चौथ्या आठवड्यात भिमथडी जत्रेला परवानगी देण्यात आली असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

निर्बंधांबाबत काय म्हणाले अजित पवार

विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत केंद्र सरकार जी नियमावली तयार करेल तिचे पालन केले जाईल, असे सांगताना अजित पवार म्हणाले की, पुण्यात कोरोनाची परिस्थिती तुलनेने बरी आहे ,पण जागतिक पातळीवर नव्या प्रकारचा व्हायरसचा फैलाव होत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे, याबाबत वेगवेगळ्या प्रकारची मते असून, राज्यातल्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेणार आहेत. दरम्यान, राज्यात काही निर्बंध पुन्हा आणावी लागतील असा सूचक इशारदेखील त्यांनी यावेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT