ajit pawar kirit somaiya sakal
पुणे

कोविड सेंटरमध्ये घोटाळ्याच्या सोमय्यांच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं उत्तर

अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर ही माहिती दिली.

सुधीर काकडे

पुणे : अजित पवार यांनी नेहमी प्रमाणे आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी पुण्यातील (Pune) सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. तसंच पुण्यातील जम्बो कोविड सेंटरवर (Jumbo Covid Center) केलेल्या आरोपांवर देखील त्यांनी उत्तर दिलं. काल किरीट सोमय्या (Kirit Somaiya )यांनी जम्बो कोविड सेंटरमध्ये (Jumbo Covid Centar) घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना या सेंटरमध्ये राज्य सरकार, मनपाच्या संयुक्त विद्यमाने काम केलं जात असतं. त्यामध्ये सीओईपी (COEP) आणि आणखी एक अशी कोविड सेंटर (Covid) तयार करण्यात आली. त्यामध्ये कोणत्याही राजकारण्याला न सहभागी करून घेता सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालवण्यात आलं. त्यावेळी सर्व कारभार पारदर्शक ठेवण्याचा कारभार व्हावा अशा सुचना देण्यात आल्या होत्या. आजच्या या बैठकीत त्याबद्दलचे सर्व अपडेट्स आज अधिकाऱ्यांनी दिले असून, त्यामध्ये काहीच गैरकारभार झाला नाही असं अजित पवार यांनी सांगितलं. तसंच कोणी काय आरोप केलेत? कोण काय बोललं? यावर प्रतिक्रीया द्यायला आपल्याला वेळ नाही असं अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले. (ajit pawar answer to kirit somaiya allegations jumbo covid center pune)

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 15 ते 18 वयोगटातील 90 टक्के मुलांचं लसीकरण झालंय. जिल्ह्यात काही प्रमाणात कोव्हॅक्सीनचा तुटवडा आहे, त्याबद्दल केंद्र सरकारकडून मागणी केली असून, तयारी सूरू आहे. थिएटर मध्ये 50 टक्के उपस्थितीची परवानगी आहे, त्यात शिथिलता आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांशी बोलून करता येईलथेट तसंच नियमांमध्ये शिथीलता आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. वीज खंडीत का झाली होती, त्याची चौकशी केली. त्यामध्ये तांत्रिक वाहिन्यांमध्ये बिघाड झाला, त्यानंतर चाकण, लोणीकंद येथील प्रवाह खंडीत झाला, त्यानंतर जवळपास सर्व ठिकाणी वीज खंडीत झाल्याचं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT