Ajit Pawar asks for resignation of Opposition leader Dilip Barate in Pune MC 
पुणे

पुणे महापालिकेत अजित पवारांनी घातलं लक्ष; नवा नेता निवडणार!

ज्ञानेश सावंत

पुणे : पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेस घेतला असून, विद्यमान विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांना राजीनामा देण्याचे फर्मान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी सोडले. विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीत बसण्यासाठी नगरसेवक दिपक मानकर, विशाल तांबे, नंदा लोणकर, योगेश ससाणे हे प्रयत्नशील आहेत.

महापालिकेत बराटेंना बदलून या पदावर आपल्या समर्थकाची निवड करण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी, महापालिकेतील विरोधी बाकांवर राष्ट्रवादीत अजित पवारांची हुकूमत राहण्याची चिन्हे आहेत. 

विरोधी पक्षनेतेपदाची मुदत संपल्याने राजीनामा देण्याची सूचना बराटेंना केली आहे. त्यानुसार नव्या नेत्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करू. त्यासाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यात येणार आहेत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे यांनी सांगितले. 

महापालिकेतील विरोधी बाकांवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. पहिले विरोधी पक्षनेते चेतन तुपे हे शहराध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्याजागी बराटेंना संधी देण्यात आली. लोकसभा निवडणुकीआधी खासदार सुप्रिया सुळे यांच्या आग्रहावरून बराटेंची निवड झाली. या निवडणुकीत खडकवासल्यातून बराटेंचा फायदा होण्याची आशा सुळे यांना होती. त्यात बराटे हे सुळे यांचे समर्थक मानले जातात. 

मात्र, राष्ट्रवादीतील जुन्या-जाणत्या नगरसेवकांची संख्या पाहता विरोधी पक्षनेतेपदावर दर सव्वावर्षांनी नव्या नेत्याची निवड करण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे. त्यानुसार बराटेंची मुदत संपल्याने नव्या नेत्याची निवड करण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली होती. मात्र, राज्यातील नवे सरकार, मंत्रीमंडळ विस्तार, त्यानंतरचे खातेवाटपाच्या गोंधळात नव्या नेत्यांची निवड होऊ शकली नव्हती. मात्र, विविध बैठकांनिमित्त पुण्यात आलेल्या अजित पवारांनी अखेर बराटेंना राजीनामा देण्याचा आदेश दिला. त्यानंतर लगेचच या पदासाठी अजितदादा समर्थक मानकर, सासणे यांनी "लॉबिंग' करण्यास सुरवात केली. त्याचवेळी तांबे, लोणकरांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र, हे पद आपल्याच गोटातील नगरसेवकाकडे सोपवून महापालिकेत सत्ता नसतानाही दबदबा राखण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे, असे सांगण्यात येत आहे. 

तुपे म्हणाले, "या पदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येतील. त्यासाठी चार दिवसांची मुदत आहे. येत्या 22 जानेवारीपर्यंत नवा नेता निवडला जाईल. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर लक्ष ठेवून पुणेकरांना न्याय देणाऱ्या नगरसेवकाची निवड केली जाईल.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govind Pansare : ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे कोण होते? आता का चर्चेत आले?

Ancient Shiva Temple : 600 वर्षांपूर्वीचे शौर्य दगडात जिवंत! बारा ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात मध्ययुगीन कीर्तिमुख शिल्प, सतीगळाचा शोध; काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live : कोथरुडमधील ‘निर्वाण बिहार’ सोसायटीत गुंडाची दहशत

Solapur Crime: साेलापूरात ‘एटीएम’मध्ये पैसे भरताना तरुणाला मारहाण; सातरस्ता परिसरातील एटीएममधील प्रकार, सीसीटीव्हीवरून शोध!

Gold Rate Today: सोनं-चांदीत मोठी घसरण! सलग पाचव्या दिवशी सोनं स्वस्त; आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT