Ajit Pawar  
पुणे

Ajit Pawar : "नवीन पायंडे पाडू नये..." ; पुणे पोलिसांच्या मास्टर प्लॅनवर अजित पवार संतापले

सकाळ डिजिटल टीम

पुणे शहरात कोयता गँगची दहशत वाढत आहे. तरुण हातात धारदार शस्त्रे (कोयता) घेऊन दहशत पसरवताना दिसत आहेत. तसेच याशिवाय चोरटे धारदार शस्त्रे दाखवून रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना धमकावतात त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. कोयता गँगला रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी मास्टर प्लन आखला आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अजित पवार म्हणाले, "एखादा गुंड अजिबातच सापडत नसेल तर त्याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले जाते. वीरप्पन, चार्ल्स शोभराज सापडत नव्हते तेव्हा अशा प्रकारचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मात्र सरसकट बक्षीस जाहीर केले जात असेल तर पोलीस यंत्रणांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. पोलिसांनी नवीन पायंडे पाडू नये."

पुणे पोलिसांच्या मास्टर प्लॅन काय?

कोयता बाळगणार्‍याला पकडा आणि बक्षीस मिळवा, अशी योजना पुणे पोलिसांनी आखली आहे. हत्यार बाळगणाऱ्या गुंडाना पकडणार्‍या पोलिसांवर आता पोलीस विभाग बक्षीसांची खैरात करतील. पुणे शहर परिसरात गेल्या काही दिवसापासून कोयता गँगने धुमाकूळ घातला असून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 

या योजनेनुसार, पिस्तूल जवळ बाळगणार्‍या गुंडाला पकडल्यास दहा हजार तर, कोयता बाळगणार्‍याला पकडल्यास तीन हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. 

बक्षिसाचे स्वरूप...

  • शस्त्र अधिनियम कलम ३, २५ नुसार दहा हजार रुपये

  • शस्त्र अधिनियम कलम ४,२५ नुसार तीन हजार रुपये

  • फरारी आरोपीस पकडणे १० नुसार हजार रुपये

  • पाहीजे आरोपीस पकडणे ५ हजार रुपये

  • मोक्कातील आरोपी पकडणे ५ हजार रुपये

  • एमपीडीएतील आरोपी पकडणे ५ हजार रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT