ajit-web.jpg 
पुणे

अजित पवारांच्या रडारवर असणार आता 'हे'?  

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सत्ताधाऱ्यांना खूष ठेवणारे आणि राजकीय सुडापोटी तेव्हाच्या विरोधकांना म्हणजे, राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जाच केलेल्या पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना नवे सरकार बदलीची शिक्षा देण्याच्या विचारात आहे. तसे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.

खासदार-आमदारांना न जुमानलेल्या पुण्यातील काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे संकेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात दिले. त्यामुळे अजित पवारांच्या रडावर कोणते पोलिस अधिकारी येणार ? याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीनंतरच्या सत्ता नाट्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच पवार यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांशी मोकळा संवाद साधला. आपल्या भाषणातून थेट प्रश्‍न विचारत त्यांनी कार्यकर्त्यांना बोलते केले. तेव्हा आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांचाही उल्लेख केला. तेव्हा, एक अनुभव सांगता ते म्हणाले, ''एका लोकप्रतिनिधीला अटक केल्यानंतर कोणताही गुन्हा नसताना त्याच्या कुटुंबियानांही कायद्याचा धाक दाखवत अटक करण्याची धमकी या आधिकाऱ्यांनी दिली.

प्रसंगी कुटुंबातील सदस्यांविरोधात मोक्का लावण्याच्या हालचाली केल्या. अधिकाऱ्यांचे हे वागणे बरे नाही. अशा आधिकाऱ्यांना मग तो कितीही मोठा असो, त्याची गय करणार नाही.'' 

गेल्या पाच वर्षात पोलिस आधिकाऱ्यांशिवाय महसूल विभागातील अनेक आधिकाऱ्यांनीदेखील असहकाराची भूमिका घेतली होती. यांच्यापैकी कालमर्यादेच्या अधीन राहून ज्यांच्या बदल्या करता येणे शक्‍य आहे, अशा सर्वांना पुण्याबाहेर पाठविण्याचा जणू संकल्पच अजित पवार यांनी केला आहे.

त्यामुळे येत्या काळात पुण्यात अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या तसेच गेल्या पाच वर्षात कार्यकर्त्यांना असहकार करणाऱ्या किंवा त्रास देणाऱ्या आधिकाऱ्यांची बदली निश्‍चितपणे केली जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

प्रेक्षकांना कसा वाटला 'वचन दिले तू मला' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात, 'एपिसोड छान होता पण...'

Kolhapur Muncipal : मनपा निवडणूक आचारसंहिता लागू होताच कारवाई; कोल्हापुरात इच्छुकांचे फलक हटवले

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी

SCROLL FOR NEXT