ajit pavar  
पुणे

पोलिस अधिकाऱ्याला पाहून भडकले अजितदादा...म्हणाले, मी ऐकतोय ते खरे आहे का? 

कल्याण पाचांगणे

माळेगाव (पुणे) : बारामती तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट उपविभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना धारेवर धरले. तुम्हा जमत नसेल, तर तसे मला सांगा, असा थेट इशारा दिला.   

बारामती तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अवैध धंद्यांतही वाढ झाली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युवकांनी डोके वर काढले आहे. तसेच, अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्यांच्या छळाने कंटाळून शेतकरी, शेतमजूर आणि लघुउद्योजक आत्महत्यांचा मार्ग स्विकारत असल्याची प्रकरणे उघड होत आहेत. या प्रकरणांबाबत सोशल मिडियावर चर्चा झडत आहेत. त्याची गंभीर दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली.  

अजित पवार हे आज शारदानगर येथे विकास कामांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी उपविभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर हे तेथे आले. त्यांना पाहून अजित पवार म्हणाले, बारामती तालुक्यात गुन्हेगारांचे काय चाललंयं...मी ऐकतोय ते खरे आहे का? मला गुन्हेगारी अजिबात चालणार नाही. तुम्हा जमत नसेल, तर तसे मला सांगा...

त्यावर शिरगावकर यांनी, दादा, संबंधितांवर तडीपारीच्या कारवाई सुरू केल्या आहेत. अवैध व्यवसायिकांवरसुद्धा पोलिस कारवाई चालून आहे. यापुढे अधिक काळजी घेतो,` असे सांगून अजित पवार यांचा पारा शांत करण्याचा प्रय़त्न केला. 

या प्रकारानंतर शिरगावकर यांनी लागलीच बारामती तालुक्याचे पोलिस निरिक्षक अण्णासाहेब घोलप, शहरचे पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांना संपर्क साधत अवैद्य व्यवसायिकांसह गुन्हेगारांवर अधिक कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT