chandrakant patil  ashok gavahne
पुणे

'अजित पवार 24 तासांपासून नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर'

कात्रजमध्ये आजपासून ३० ऑक्सिजन आणि १० क्वारंटाईन बेड उपलब्ध

अशोक गव्हाणे

कात्रज-कोंढवा रस्त्यावर माऊली गार्डन येथे आनंद हॉस्पिटल धनकवडी व कात्रज-कोंढवा रोड विकास प्रतिष्ठान संचलित ४० बेड्सचे कोविड केअर सेंटर स्थानिक नगरसेविका मनिषा कदम यांच्या प्रयत्नातून चालू करण्यात आले आहे.

कात्रज : राज्यासह पुणे जिल्ह्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती असून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळित होत नाही. अशात जिल्ह्याचे पालकमंत्री २४ तासांपासून नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर आहेत. मागील २४ तासांपासून अजित पवार यांच्याशी संपर्क होत नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील माऊली कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, ''सध्या रुग्णांची संख्या खूप वाढत आहे. ते कोणाच्या हातात नाही, अशात काळजी घ्यायला हवी. सध्याची परिस्थिती पाहता या कोविड सेंटरकडून लोकांची चांगली सेवा होईल, अशा शुभेच्छा मी देऊ शकतो, पण हे कोविड सेंटर जास्त काळ चालावे अशा शुभेच्छा मी देणार नाही. ते योग्य नाही.

कात्रज-कोंढवा रस्त्यावर माऊली गार्डन येथे आनंद हॉस्पिटल धनकवडी व कात्रज-कोंढवा रोड विकास प्रतिष्ठान संचलित ४० बेड्सचे कोविड केअर सेंटर स्थानिक नगरसेविका मनिषा कदम यांच्या प्रयत्नातून चालू करण्यात आले आहे. याठिकाणी ४०पैकी ३० ऑक्सिजन तर १० क्वारंटाईन बेड्सचे नियोजन करण्यात आले असून नागरिकांसाठी अल्पदरात ते उपलब्ध करण्यात आले आहेत. यावेळी नगरसेविका रंजना टिळेकर, राणी भोसले, वृषाली कामठे, नगरसेवक वीरसेन जगाताप, अशोकानंद कंवर महाराज, राजाभाऊ कदम उपस्थित होते.

राज्यसरकारचे महापालिकेला सहकार्य नाही

राज्यसरकार महापालिकेला व्यवस्थित सहकार्य करत नसल्याने रुग्णांना सेवा देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. दोन दिवसांपू्र्वी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने विकासकामाच्या निधीतून ३५० कोटी रुपये बाजूला काढले आहेत. परंतु, ते पैसे अजित पवारांच्या समोर नेऊन ठेवले तर ते आरोग्य सुविधा देऊ शकणार आहेत का? असा प्रश्न करत पाटील यांनी औषधे, ऑक्सिजन, रेमडिसिव्हिर यांचा सुरळित पुरवठा व्हायला हवा, अशी मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शैक्षणिक सहलींसाठी विद्यार्थ्यांसाठी सहलीत ५० टक्के सवलत; प्रत्येकास १० लाखांचा अपघात विमाही; एसटी महामंडळाचे आगारप्रमुख जाणार शाळांमध्ये

आजचे राशिभविष्य - 19 नोव्हेंबर 2025

Horoscope Prediction : आज तयार होतोय अमला राजयोग; मेष आणि या पाच राशींच्या आर्थिक अडचणींना लागणार पूर्णविराम !

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात रवा पिझ्झा बॉल ट्राय केले का? लगेच लिहून घ्या रेसिपी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT