Sharad Pawar And Ajit Pawar Sakal
पुणे

अजित पवार म्हणजे दर्जेदार विकास; शरद पवारांकडून शाबासकीची थाप

आपल्या भाषणात शरद पवार यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीचे मोकळेपणाने कौतुक केले.

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : अजित म्हणजे दर्जेदार विकास हे सूत्र आता राज्याला माहिती झाले आहे, कोणतेही काम हातात घेतले की ते उत्तमपणे तडीला न्यायचा अजितचा स्वभाव आहे, पण मला अनेकदा याचा त्रासही होतो. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज येथील तालुका पंचायत समितीच्या नूतन वास्तूच्या इमारत उदघाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांना शाबासकीची थाप दिली. ही थाप देतानाच त्यांनी एका होणा-या गोड त्रासाचाही उल्लेख केला.

आपल्या भाषणात शरद पवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यशैलीचे मोकळेपणाने कौतुक केले. ते म्हणाले, राज्यात कोठेही गेलो तरी बारामतीसारख्या वास्तू हव्यात असा आग्रह होतो. मध्यंतरी वकील भेटले ते म्हणाले, बारामतीसारखे न्यायालय हवे, विश्रामगृहाची मागणी झाली तीही बारामतीसारखीच, बारामतीचे मेडीकल कॉलेज पाहिल्यानंतर राज्यातील लोक आता अशीच वास्तू आम्हालाही हवी असे म्हणतात.

मेडीकल कॉलेज एका वर्षात देशातील एक उत्तम कॉलेज म्हणून नावारुपाला येईल. बारामती सारख्याच वास्तू हव्यात असा आग्रह लोक धरतात असा तो त्रास असतो असा उल्लेख शरद पवार यांनी हसत केला.

अजित पवार यांनी काम हातात घेतल्यानंतर ते नेटके, सुबक व स्वच्छ असावे असा त्यांचा आग्रह असतो, त्यांच्या प्रयत्नांमुळे बारामतीचा चेहरामोहरा बदलला तसेच या भागातील लोकांचे राहणीमानही बदलले, याचे मला समाधान वाटते, अशा शब्दात शरद पवार यांनी अजित पवार यांची प्रशंसा केली. कोणतेही काम करताना ते उत्तमच असावे हा त्यांचा आग्रह असतो आणि त्याने आज बारामतीचे रुप बदलले दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तिकीट कापलं जाण्याची भीती, आमदाराचं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन; ट्रेनमध्ये 'अंडरवेअर कांड'मुळे होते चर्चेत

Palghar News:'हजारो आदिवासी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले'; घोषणाबाजीने कार्यालय दुमदूमले, सरकारचे लक्ष वेधणार

Giorgia Meloni : खूप सुंदर आहात, फक्त सिगारेट ओढू नका; PM मेलोनी यांना मिळाला सल्ला, इटलीच्या पंतप्रधान कोणती सिगारेट ओढतात?

अधुरी एक कहाणी...आज 'या' राजघराण्याच्या सुनबाई असतात लता मंगेशकर ! अखेरपर्यंत दोघंही राहिले अविवाहित

'Rohit Sharma, विराट कोहली मागील १०-१५ वर्ष खेळत आहेत, आता...'; शुभमन गिल हे असं का म्हणाला? गंभीरच्या विधानानंतर भाई सुटला...

SCROLL FOR NEXT