Ajit Pawar and Chhagan Bhujbal eSakal
पुणे

Ajit Pawar on Bhujbal: "भुजबळ काय म्हणाले, ऐकूच आलं नाही"; शरद पवारांवरील टीकेवर अजितदादांचं स्पष्टीकरण

काल बीडच्या सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली त्यामुळं भुजबळांविरोधात निषेध आंदोलन होत आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : बीडच्या सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली त्यामुळं भुजबळांना मोठ्या ट्रोलिंगला समोरं जावं लागत आहे, त्यांच्याविरोधात निषेध आंदोलन होत आहेत.

यापार्श्वभूमीवर भुजबळांनी शरद पवारांवर केलेली टीका अजित पवारांना पटली का? या पत्रकारांच्या सवालावर मला भुजबळांचं भाषण ऐकूच आलं नाही, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी सेफ राहण्याचा प्रयत्न केला आहे. (Ajit Pawar speaks on Chhagan Bhujbal Beed rally speech against Sharad Pawar)

पुण्यात पत्रकार परिषदेत अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, काल भुजबळांनी जे भाषण केलं त्यावर अनेकांकडून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. भुजबळांचे मुद्दे तुम्हाला पटले आहेत का?

यावर अजितदादा स्पष्टीकरण देताना म्हणाले, "मी जिथं बसलो होतो, तिथं माईक सिस्टिम अशी होती की समोरच्या पब्लिकला ते ऐकायला जात होतं. पण मला ते भाषण नीट ऐकायलाच मिळालं नाही. त्यासंदर्भात मी नंतर ज्यावेळी संपूर्ण कार्यक्रम संपला आणि मी बीडवरुन औरंगाबाद आणि तिथून पुण्याला आलो तेव्हा सोशल मीडियात मला काही बातम्या पहायला मिळाल्या" त्याबद्दल वस्तुस्थिती नेमकी काय झाली याबाबत माझा भुजबळांना अद्याप फोन झालेला नाही. कारण पुण्यात सकाळी माझे काही कार्यक्रम होते.

याची काळजी घ्यायला हवी

पण एकंदरीतच माझं स्पष्ट मत आहे, की राजकीय जीवनात काम करत असताना आपण आपली भूमिका अतिशय ठामपणे मांडण्याचं काम केलं पाहिजे, परंतू ती मांडत असताना कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची पण काळजी घेतली पाहिजे," असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

ठाण्यात भुजबळांविरोधात आंदोलन

शरद पवारांविरोधात भाषणात जोरदार टीका केल्यानं ठाण्यात छगन भुजबळ यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या पवार समर्थक कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी भुजबळांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Latest Marathi News Update : खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT