Ajit Pawar sakal
पुणे

Ajit Pawar : झाल गेल विसरुन नव्या उमेदीने निवडणूकीला सामोरे जा...

लोकसभेला झाल गेल ते विसरुन, गटतट व मतभेद विसरुन एकत्र येत एकजूटीने नव्या उमेदीने विधानसभेच्या निवडणूकीला सामोरे जाण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.

मिलिंद संगई,

बारामती - लोकसभेला झाल गेल ते विसरुन, गटतट व मतभेद विसरुन एकत्र येत एकजूटीने नव्या उमेदीने विधानसभेच्या निवडणूकीला सामोरे जाण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.

बारामतीत राष्ट्रवादीच्या बूथ कमिटी कार्यकर्त्याच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. पक्ष निरिक्षक सुरेश पालवे, किरण गुजर, जय पवार, केशवराव जगताप, सचिन सातव, संभाजी होळकर, जय पाटील, अनिता गायकवाड, ज्योती लडकत, जयसिंग देशमुख, सुभाष सोमाणी, विक्रम भोसले, सुनिल पवार आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, ही निवडणूक महत्वाची आहे. पाच वर्षे विरोधात होतो तेव्हा मतदारसंघाची काय स्थिती झाली होती हे मी सांगायला नको. कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी गटतट व मतभेद विसरुन काम करायला हवे. तक्रारी करण्यापेक्षाही विधायक सूचना करा, परस्परांविषयी बाहेर कोठेही काहीही बोलू नका, अजित पवार बनून मतदारांपर्यंत पोहोचून कामे त्यांच्यापर्यंत पोहोचवा.

विरोधक काहीतरी बोलून उचकविण्याचा प्रयत्न करतील, त्याला बळी पडू नका, झाल गेल विसरुन आता नव्या उमेदीने कामाला लागू यात. या पुढील काळात आपल्याला बेरजेचे राजकारण करायचे आहे, वजाबाकीचे नाही, याची जाणीव सर्वांनीच ठेवायला हवी.

शेतक-यांच्या साडेसात, पाच व तीन अश्वशक्तीच्या वीजेच्या मोटारीचे बिल पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्या साठी 14761 कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीला विजयी केले तर या पुढील काळातही शेतक-यांचे कृषीपंपाचे वीजबिल शून्यच असेल, असे सांगायला ते विसरले नाहीत.

किरण गुजर यांनी प्रास्ताविकात बूथ कमिटी रचना व इतर बाबींबाबत माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal to Amit Shah : ‘’...अशा मंत्र्याने, पंतप्रधानांनीही त्यांचे पद सोडावे का?'’ ; केजरीवालांचा अमित शहांवर निशाणा!

IPL: एबी डिव्हिलियर्स RCB संघात परतण्यास तयार! म्हणाला, 'माझं मन नेहमीच...'

Ajit Pawar: गणेशोत्सवाआधी आनंदाची बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांना पगार कधी मिळणार? अजित पवारांनी तारीखच सांगितली

What a Comeback: मिराबाई चानू वर्षभरानंतर स्पर्धेत उतरली अन् पटकावलं ऐतिहासिक 'गोल्ड'; सोबत चार खेळाडूंनीही जिंकले सुवर्ण

Ashtavinayak Darshan: श्रीगणेशाच्या आठ रूपांचं दर्शन हवंय? अष्टविनायक मंदिरांची संपूर्ण माहिती एका क्लिकवर वाचा!

SCROLL FOR NEXT