ajit pawar.
ajit pawar. 
पुणे

फॅशन स्ट्रीट आग: नुकसानीचा अहवाल 3 दिवसात द्या; पाहणीनंतर अजित पवारांचे आदेश

सकाळवृत्तसेवा

पुणे : फॅशन स्ट्रीट मार्केटला लागलेल्या आगीच्या घटनेच्या नुकसानीचे येत्या 3 दिवसात मूल्यमापन करा, त्याविषयीचा अहवाल शुक्रवारी द्या, त्यानंतर लवकरच अंतिम बैठक घेऊ,असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री पवार यांनी सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता लष्कर परिसरातील आगीत जळालेल्या फॅशन स्ट्रीट मार्केटला भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी देशमुख, पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाचे अधिकारी, सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत सांगले, लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम आदी उपस्थित होते. पवार यांनी आग लागलेल्या दुकानाची पाहणी केली, त्यांनी नुकसान झालेल्या दुकानदाराशीही संवाद साधला. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची कैफियत दुकानदारानी मांडली. त्यांचे म्हणणे ऐकून घेत पवार त्यांनी जिल्हाधिकारी देशमुख यांना आदेश दिला. फॅशन स्ट्रीट मार्केटला लागलेल्या आगीच्या घटनेचे येत्या 3 दिवसात मूल्यमापन करा, शुक्रवारी अहवाल दिल्यावर आगीविषयी अंतिम बैठक घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशमुख यांना सांगितले.

एक-दोन नव्हे, तर तब्बल अडीच हजार जण आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या सुमारे ८ ते १० हजार जणांचे जगणे त्या एकट्या बाजारपेठेवर अवलंबून होते. पण, शुक्रवारी लागलेल्या आगीत केवळ बाजारपेठच जळून खाक झाली नाही, तर त्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांच्या तोंडचा घासही हिरावून घेतला गेला. महात्मा गांधी रस्त्यावरील (एमजी रोड) फॅशन स्ट्रीटमध्ये खरेदीसाठी पुण्याबरोबरच बाहेरच्या तरुण ग्राहकांची सर्वाधिक पसंती असते. एमजी रोडवर बसणाऱ्या विक्रेत्यांचे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने 2000 मध्ये अंतर्गत भागात सध्याच्या ‘फॅशन स्ट्रीट’मध्ये स्थलांतरित केले होते. कपडे, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने, चामडी व गृहपयोगी वस्तू अशा विविध प्रकारची दुकाने व स्टॉल्सनी ही बाजारपेठ गजबजली असते. मार्च २०२० मध्ये लॉकडाउन सुरू झाला. त्यानंतर इतर व्यवसायांप्रमाणेच इथल्या व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ पोचली. ही झळ सहन करीत काहींनी घरातील सोने गहाण ठेवून, तर काहींनी कर्ज काढून पुन्हा व्यवसायाला सुरूवात केली होती. तीन महिन्यांपासून व्यवसाय चांगला चालू लागला होता मात्र, त्यातच पुन्हा एकदा लॉकडाउन लागण्याची धाकधूक विक्रेत्यांमध्ये होती. त्यातच शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास फॅशन स्ट्रीटला आग लागली. त्या आगीबरोबरच तेथील विक्रेते, कामगारांचे जगणेही अक्षरशः रस्त्यावर आले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kyrgyzstan Violence : किर्गिस्थान हिंसाचार! संभाजीनगर, धाराशिव, बीडचे ५०० विद्यार्थी अडकले; होणार ऑनलाईन परीक्षा

Hit & Run Case : जेव्हा सलमानवर दाखल झाली होती हिट अँड रन केस ; पुण्यातील प्रकरणानंतर पुन्हा 'ती' घटना चर्चेत

Pune Porsche Accident: आम्ही आमची मुलं मोठी होत नाहीत पर्यंत...', पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर वडिलांचा राग अनावर

Latest Marathi News Live Update: पुणे विद्यापीठातील प्रवेशासाठी मुदतवाढ

Career Options for Arts Stream: कला शाखेचे विद्यार्थी या क्षेत्रात करू शकतात करिअर, दरमहा होईल लाखोंची कमाई

SCROLL FOR NEXT