Akash Phuke's short film won on yodha at 80.jpg
Akash Phuke's short film won on yodha at 80.jpg 
पुणे

PowerAt80 : "तेव्हाही आणि आजही' मोहोर ; आकाश फुके याच्या शार्टफिल्मने मारली बाजी

सकाळवृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त "योद्धा @ 80' या लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात पुण्यातील आकाश फुके यांच्या "तेव्हाही आणि आजही' या शॉर्टफिल्मने प्रथम पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत राज्यभरातून तीनशेहून अधिक संघांनी सहभाग घेतला.

पवार यांच्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीची माहिती लघुपट अथवा माहितीपटाच्या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत पोचावी व चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवकांकडून पवार यांच्या कारकिर्दीवर चांगल्या कलाकृतींची निर्मिती व्हावी, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. स्पर्धेत द्वितीय पारितोषिक बीड येथील कल्याणी राजेश शिंदे यांच्या 'पंख' आणि तृतीय पुरस्कार डोंबिवली येथील सात्त्विक वेलसकर यांच्या "दोस्त' या लघुपटाला मिळाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

प्रथम क्रमांकासाठी रोख एक लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 75 हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 50 हजार रुपये आणि सर्वांना करंडक व प्रमाणपत्र असे बक्षिसांचे स्वरूप आहे. या व्यतिरिक्त विशेष पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. स्पर्धेच्या अंतिम परीक्षक समितीमध्ये चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे व अभिनेते अतुल परचुरे यांचा समावेश होता.

प्रथम पारितोषिकाचे वितरण 12 डिसेंबरला शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील विशेष कार्यक्रमात करण्यात येणार आहे. तर उर्वरित सर्व बक्षिसांचे वितरण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वाधिक लाईक्‍स मिळणाऱ्यांचाही गौरव

"सुप्रिया सुळे एनसीपी' युट्युब चॅनेलवर हे लघुपट अपलोड करण्यात आले आहेत. त्यातील सर्वांत जास्त लाईक्‍स मिळविणाऱ्या प्रथम तीन फिल्मला बक्षिसे जाहीर करण्यात येणार आहेत. ही बक्षिसे 22 डिसेंबरला जाहीर करण्यात येतील. 20 डिसेंबरपर्यंतचे युट्युब चॅनेलवरील फिल्मला मिळालेले लाईक यासाठी ग्राह्य धरले जातील, अशी माहिती आयोजकांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

SCROLL FOR NEXT