बोंडलेत अखंड हरिनाम सप्ताह सोहळा
बोंडले : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व श्री जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने व ह. भ. प. बाळू पाटील महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या बोंडले (ता. माळशिरस) नगरीत १९ जानेवारी २६ जानेवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे हे सलग ४४ वे वर्ष आहे. या सोहळ्यात काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ व कीर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
तसेच १९ रोजी जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज श्रीगुरू ह. भ. प. चैतन्य महाराज (देहूकर) यांच्या संकीर्तनाने सप्ताहाची सुरवात होणार आहे. तर २० रोजी ह. भ. प. सुरेश महाराज सुळ (अकलूज), २१ रोजी ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली), २२ रोजी ह. भ. प. जगन्नाथ महाराज देशमुख (पंढरपूर), २३ रोजी ह. भ. प. उल्लास महाराज सूर्यवंशी (आळंदी) यांच्या काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वाटपाने सप्ताहाची सांगता होणार आहे.