wine1.jpg
wine1.jpg 
पुणे

मुर्खपणाच कळस! पुण्यात क्वारंटाईन केंद्रातच रुग्णांनी मागवली दारू

शीतल बर्गे

बालेवाडी (पुणे) : क्वारंटाइन केलेल्या रुग्णासाठी जेवणाचा डबा आला, तो खाण्याची वेळ झाली, पण त्याआधीच दारावर डबा उघडला गेला आणि त्या डब्यात रस्साभाजी ऐवजी चक्क दारूच्या बाटल्या निघाल्या, म्हणजे जेवणा बरोबर एक-दोन नाही तर चार बाटल्या दारूच्या रुग्णास देण्यासाठी आणण्यात आली होत्या. हा सगळा प्रकार कुठे घडला असावा? तो घडलायं महापालिकेच्या बालेवाडी येथील निकमार कोविड केअर सेंटरमध्ये. त्यामुळे क्वारंटाइन सेंटर आणि कोविड केअर सेंटर मधल्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आलाय. पण महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी तत्परता दाखवून जेवण आणि दारू वेगळी केली. 

दारू वेगळी करताना सुरक्षारक्षकांच्या हाती पत्तेही लागले. क्वारंटाइन सेंटर व कोविड केअर सेंटरमध्ये खरंच काय चाललंय याचा विचार न केलेलाच बरा. शहरात जसजशी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली, तसे शहरातील अनेक रुग्णांना बालेवाडी येथील निकमारमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले. या ठिकाणी लहान मुलांपासून, वृद्ध नागरिकांवरही येथे उपचार केले जात आहेत. सध्या येथे सातशे पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण ठेवले असून, त्यांची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली आहे. असे असताना काही रुग्ण आम्हाला इथले जेवण नको असे म्हणत नातेवाईक त्यांना डबा आणून पोहोच करत आहेत. 

महापालिकेकडून एवढी मुभा देऊन सुद्धा कोरोना बाधित रुग्णांकडून अशी दारूची मागणी झाल्याने सगळेच अवाक झाले. असा प्रकार समोर आल्याने कोरोना साथीलाच दारूची लागण झाले की काय असे म्हणावे लागेल. दुपारी साधारण बारा ते साडे बाराच्या दरम्यान एका रुग्णाचा नातेवाईक डबा घेऊन निकमारच्या प्रवेशद्वाराजवळ आला. त्यावेळी महापालिकेचे सचिन सकाटे, निखील मोरे, ओंकार तागडे हे सुरक्षा रक्षक त्यांचे काम करत होते. त्यावेळी त्यांनी नातेवाईकाकडची डब्याची पिशवी उघडून पाहिली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. 

याठिकाणी व्यवस्थापनाकडून पोलिसांना हा प्रकार कळविण्यात आला असून पोलिस पुढची कार्यवाही करीत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. एकीकडे शासन व महापालिका प्रशासन दिवस-रात्र एक करोना साथीवर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरीकडे मात्र दारूसाठी अशा वेगवेगळ्या शकला लढवल्या जात आहेत. येथे मनोरंजनाची सुविधा नसल्याची तक्रार आली आहे. दुपारच्या वेळेत काय करायचे? यासाठी जेवण आणि दारू बरोबर मनोरंजनासाठी पत्त्यांची व्यवस्थाही केल्याचे उघडकीस आले आहे. 
 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

या ठिकाणी रुग्णासाठी बाहेरून डबे किंवा इतर सामान आणले जाते ते गेटवरच तपासून पुढे पाठवले जाते, त्यावेळी हा प्रकार समोर आला आहे. याची कल्पना महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यांच्या कडून पोलिसांना पण कळवण्यात आले आहे. 
-सचिन सकाटे, सुरक्षा रक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT