पुणे

#PuneRains : घोडनदी काठच्या आंबेगाव व शिरूर तालुक्यातील ३५ गावांना सतर्कतेचा इशारा

विवेक शिंदे

महाळुंगे पडवळ : ‘‘आंबेगाव तालुक्यात हुतात्मा बाबू गेनू सागराच्या (डिंभे धरण) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. गुरुवारी (ता.१५) पहाटे धरणातून घोडनदी पात्रात पाच हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली असून घोडनदी काठच्या आंबेगाव व शिरूर तालुक्यातील ३५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे,’’ अशी माहिती डिंभे धरणाचे कार्यकारी अभियंता तान्हाजी चिखले यांनी दिली.

हुतात्मा बाबू गेनू सागर १०० टक्के भरले होते. तसेच तालुक्यात पाऊसही उघडला होता. त्यामुळे कुकडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घोडनदीवर असलेल्या कोल्हापुर पद्धतीच्या बंधाऱ्यांना ढापे बसविण्यात सुरु केली होती. चांडोली बुद्रूक, कळंब व वडगाव काशिंबेग येथील बंधाऱ्यांना ढापे बसविण्याचे काम प्रगतिपथावर होते. परंतु बुधवारी दुपारनंतर आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. डिंभे धरणातून घोडनदीत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे घोडनदीवर असलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तुडुंब भरून अतिरिक्त पाणी ढाप्यांवरुन जात असल्याने बंधारे फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी बंधाऱ्याचे ढापे काढून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता दत्तात्रेय कोकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. ते म्हणाले, ‘‘चांडोली बुद्रूक, कळंब, वडगाव काशिंबेग आदी बंधाऱ्यांचे ढापे काढून पाण्याचा प्रवाह मोकळा करून देण्याचे काम कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर हाती घेतले आहे.’’

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT