All cases at a charity office will be postponed 
पुणे

धर्मादाय कार्यालयात सर्व प्रकरणांना पुढील तारखा

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कार्यालयामध्ये पक्षकारांची गर्दी टाळण्यासाठी येथील सह धर्मादाय आयुक्तांकडील सर्व प्रकरणांना जून महिन्यातील तारखा दिल्या आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी सर्व पक्षकारांना सरकारी आदेश व वैद्यकीय सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यास अनुसरून उपायुक्त नवनाथ जगताप, सहाय्यक आयुक्त अमरदीप तिडके, राहूल चव्हाण व राणी मुक्कावार-अडगुलवार या सर्वांनी एक निवेदन प्रसिद्ध करून त्यांचेकडील सर्व प्रकरणांची सुनावणी तहकूब करून पुढील तारखा दिल्या आहेत. 

पुणेकरांनी फ्ल्यूची लक्षणं दिसल्यास काय करायचं? ही बातमी वाचा!

या संदर्भात धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप म्हणाले, सरकारने लाॅकडाऊन आदेश मागे घेतल्यावर कार्यालयातील नियमित कामकाज सुरु झाल्यानांतर दोन दिवसांत सर्व प्रकरणे कार्यतालिकेवर घेण्यात येऊन सुनावणीच्या पुढील तारखा देण्यात येतील. या संदर्भात कार्यालयीन पत्रक जारी करण्यात येईल. उच्च न्यायालयाने विहित कालावधीत निकाली काढण्याचे आदेश केलेली प्रकरणे नियमित कामकाज सुरु झाल्यावर प्राधान्याने सुनावणीस घेण्यात येतील. 


पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पक्षकारांमध्ये एप्रिल व मे महिन्यात नेमलेल्या सुनावणीच्या तारखांबाबत अस्वस्थता होती. धर्मादाय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी समयसूचकता दाखवून परिस्थितीजन्य योग्य निर्णय घेतला असल्याने पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे विश्वस्त ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

Baramati News : निवडणूक पदवीधरची....बारामतीचे राजकारण ढवळून निघाले...

Marathi News Live Updates: FDA चा औषध विक्रेत्यांना दणका; राज्यात २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

Shri Someshwar Sugar Factory : सोमेश्वरच्या सभासद-कामगारांची दिवाळी झाली गोड! 90 कोटींच्या रकमा खात्यावर वर्ग; सभासदांना उर्वरित बिल तर कामगारांना बोनस जमा

Pune News : दिवाळीत फटाके उडविताना घ्या खबरदारी; अग्निशामक दलाकडून सुरक्षिततेची नियमावली

SCROLL FOR NEXT