all Employees in one back tested positive in narhe pune 
पुणे

नऱ्हे येथील एका बँकेतील सर्वच कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

विठ्ठल तांबे

धायरी : नऱ्हे येथील आय डी बी आय बँकेच्या शाखेतील सर्वच कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बँक बुधवारी बंद ठेवण्यात आली आहे. अनेक ग्राहक बँकेचे व्यवहार करण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. बॅंकेतील नऊ पैकी सात कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बँकेचे व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बँकेमध्ये ग्राहकांची मोठी वर्दळ असते. अनेक ग्राहक कोरोना पॉझिटिव्ह असण्याची शक्यता निर्माण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

बँकेतील एका कर्मचाऱ्याला दहा ते बारा दिवसांपूर्वी थंडी-ताप आला होता. परंतु दवाखान्यातून औषधे घेऊन तो कर्मचारी कामावर येत होता. यादरम्यान बँकेतील आणखी दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याला त्रास जाणवू लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी करून घेतल्यानंतर अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी केल्यानंतर नऊ पैकी सातजण पॉझिटीव्ह आले आहेत. 

रेशन कार्ड - आधार लिंक कसं करायचं? जाणून घ्या प्रक्रिया
नाही नाही नाही; केंद्र सरकारच्या 6 खुलाशांची होतेय चर्चा

''सर्व संस्थांनी शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करावे. मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डीस्टसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांचा संपर्क आला असेल त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी.''
  - बाळासाहेब गावडे-ग्रामसेवक नऱ्हे

''जे कोणी ग्राहक संपर्कात आले असतील त्यांच्या अँन्टीजन टेस्ट, स्वॅब टेस्ट प्राथमिक आरोग्य केंद्र खडकवासला यांच्या मार्फत करण्यात येतील. तसेच नागरिकांनी स्वतः पुढे येऊन टेस्ट कराव्या असे आवाहन करण्यात येत आहे.''
- प्रशांत शिर्के-गटविकास अधिकारी हवेली

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


"खबरदारी म्हणून बँक  शाखा बंद ठेवली आहे व त्याबाबतची नोटीस शाखेबाहेर लावण्यात आली आहे . नऱ्हे येथील ग्राहकांना आनंदनगर शाखेतून सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.चार दिवस बँका बंद होत्या त्यामुळे लोकांशी या कर्मचाऱ्यांचा संपर्क आला नाही. कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आलेत हे वास्तव आहे." 
- शशांक दिक्षीत, विभागीय व्यवस्थापक, आयडीबीआय बँक. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT