Ready Reckoner rate 
पुणे

रेडी-रेकनरच्या दराकडे लागले सर्वांचे लक्ष

सकाळवृत्तसेवा

पुणे - नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने २०२१-२२ या आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या (वार्षिक बाजारमूल्य दर) दरात सरसकट ३ टक्के वाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. राज्य सरकारकडून त्यावर काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान मुद्रांक शुल्कातील दोन टक्क्यांची सवलत ३१ मार्च रोजी संपुष्टात येणार आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवर्षी २ एप्रिल रोजी रेडी रेकनरचे दर नव्याने लागू करण्यात येतात. त्यानुसार मुद्रांक शुल्क विभागाने पुढील आर्थिक वर्षाच्या रेडी रेकनरच्या दरात अत्यल्प वाढ करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मध्यंतरी मुद्रांक शुल्कात सवलत दिली होती. ही सवलत येत्या ३१ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे सवलतीचा लाभ घेण्यासाठी दस्त रजिस्टर कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

मुद्रांक शुल्क विभागाकडून पुढील आर्थिक वर्षासाठीचे रेडी रेकनरचे दर तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी मागील वर्षभरात झालेल्या व्यवहारांच्या सरासरीचा आढावा घेऊन नवे दर प्रस्तावित केले आहे. त्यानुसार शहरी व ग्रामीण भागात सरासरी ३ टक्के इतकी वाढ प्रस्तावित केली आहे, अशी माहिती मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

ग्रामीण भागात येत्या काही वर्षांत मोठे प्रकल्प येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने विमानतळ, रिंगरोड, मेट्रो, रेल्वे मार्ग, एमआयडीसी, महामार्गांचे रुंदीकरण, टाउनशिप स्कीम योजनांचा त्यामध्ये समावेश आहे.

सवलतीचा फायदा
मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत दोन दिवसांनी संपुष्टात येणार आहे. परंतु या सवलतीचा फायदा चार महिन्यांपर्यंत घेता येणार आहे. ३१ मार्चपूर्वी मुद्रांक शुल्क भरून दस्तावर स्वाक्षरी केल्यास त्या तारखेपासून चार महिन्यांपर्यंत दस्त नोंदणी करता येणार आहे. तसेच सवलतीचा फायदा मिळणार आहे. ३१ डिसेंबरपूर्वी ज्यांनी मुद्रांक शुल्क भरून दस्तावर स्वाक्षरी केली आहे. त्यांना ३० एप्रिलपर्यंत दस्त नोंदणी करता येणार आहे. त्यांनादेखील सवलतीचा फायदा मिळणार आहे. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT