khadakwasla dam.jpg 
पुणे

Video : पुण्यातील धरणांबाबत महत्त्वाची बातमी...

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला (पुणे) : "टेमघर धरणाच्या गळतीच्या दुरुस्तीचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. धरणात काही काळासाठी १०० टक्के पाणीसाठा जमा झाला तरी, ते मजबूत आहे. पुणे शहरालगत असलेली चार ही धरण सुरक्षित आहे." अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते यांनी दिली. 

खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील सर्व धरणांची देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण होत आलेली आहेत. पुणेकरांसाठी सर्व धरण सुरक्षित आहे. पावसाळ्यासाठी आमची यंत्रणा सज्ज झाली आहे. असे ही त्यांनी यावेळी सांगितले. खडकवासला, पानशेत व वरसगाव या धरणाला मोहिते यांनी भेट देवून दुरुस्ती झालेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत अधीक्षक अभियंता संजय चोपडे, उपअभियंता वामन भालेराव,  शाखा अभियंता राजकुमार क्षीरसागर, तांत्रिक सहाय्यक तांत्रिक धोंडीभाऊ भागवत उपस्थित होते. 

मोहिते म्हणाले, "दरवर्षी आम्ही धरणांची तपासणी, देखभाल दुरुस्ती करतो. त्याप्रमाणे यंदा परिस्थिती काय आहे. त्यानिमित्ताने हा पाहणी दौरा आयोजित केला होता. दरवाजे व्यवस्थित काम करतात का,  त्यांची उघड- झाप करण्यात काही अडचणी आहेत का, हे पाहण्याची जबाबदारी असते. ही चारही धरण पुण्याच्यावरील भागात असल्यामुळे शहराची लोकसंख्या आणि पिण्याच्या व शेतीच्या पाणी जमा होत असल्याने याबाबत, आमचा विभाग कायम दक्ष राहणे फार महत्त्वाचे असते."
"अधिकाऱ्यांनी दुरुस्तीची कामे केलेली आहेत. ती कामे योग्य झाली का, त्यात कमतरता काही राहिली का, तशा सूचना आम्ही देतो असतो. त्यामुळे मान्सूनपूर्वची 
महत्त्वाची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. काही किरकोळ काम चालू आहेत."असे मोहिते यांनी सांगितले.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 


रिकाम्या जागेतून वार्षिक उत्पन्न मिळावे
खडकवासला धरण परिसरात असणाऱ्या रिकाम्या जागेपासून शासनाला उत्पन्न कसे मिळवता येईल. यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. सरकारची सध्याची टुरिझम पॉलिसी आहे. त्यामुळे प्रायव्हेट पार्टनरशिप करून या ठिकाणी विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून महसूल मिळविता येईल का, याची पाहणी केली. हे शासनाचे भविष्यातील धोरण असेल त्याच्या प्राथमिक नियोजनाच्या निमित्ताने येथील सर्व रिकाम्या जागेची पाहणी केली, असे ही पुणे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शिवाजीनगर मेट्रो' स्थानकाचे नाव बदलण्यावरून वाद; फडणवीसांचा तीव्र विरोध, कर्नाटकचे CM म्हणाले, 'आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे...'

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या सत्तर टक्के प्रश्नपत्रिका ‘ऑनलाईन सेट’, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

Chhagan Bhujbal : ‘ओबीसीतूनच आरक्षण हवे, तर इतर सर्व आरक्षण सोडणार का?’ भुजबळांचे आव्हान

Latest Marathi News Updates : शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी अधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणाले तर तुम्हीही घोडाच म्हणा; सरकारी कामाबाबत गडकरींचं विधान

SCROLL FOR NEXT