ujani dam
ujani dam Sakal Media
पुणे

उजनीच्या पाण्यासाठी इंदापूरमध्ये सर्वपक्षीय शेतकऱ्यांची एकजूट

राजकुमार थोरात - सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : उजनी जलाशयातून ५ टीएमसी सांडपाणी देण्यास सोलापूरकरांनी विरोध केला आहे. सोलापूरकरांना विरोध करुन इंदापूर तालुक्याला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी इंदापूर तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकरी एकवटे असून शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष कृती समितीने माध्यामातून लढा देण्याचा निर्धार केला आहे.

पुणे व पिंपरी शहरातून उजनी जलाशयामध्ये वाहून येणाऱ्या सांडपाण्यापैकी ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी वापरण्याच्या योजनेला राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या प्रयत्नामुळे २२ एप्रिल २०२१ रोजी तत्वत: मान्यता मिळाली. सदरच्या योजनेला सोलापूर जिल्हातील शेतकऱ्यांनी व पुढाऱ्यांनी विरोध करुन पाण्याचे राजकारण सुरु केले.राज्यमंत्री भरणे यांच्या विरोधात सोलाूपरमध्ये आंदोलने सुरु झाली. सोलापूरकरांच्या विरोधामुळे इंदापूर तालुक्याला हक्काचे पाणी मिळते की नाही अशी परस्थिती निर्माण झाली आहे. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी व सोलापूरकरांना विरोध करण्यासाठी व जशास तसे उत्तर देण्यासाठी इंदापूर तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकरी एकवटले आहेत. यासंदर्भात बैठक लाखेवाडी येथे नुकतीच पार पडली.

यावेळी शेतकरी कृती समितीच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील , माजी सभापती प्रशांत पाटील, बाळासाहेब करगळ, बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, निमसाखरचे माजी उपसरपंच नंदकुमार रणवरे, दत्तात्रेय घोगरे,नवनाथ रुपनवर, नंदू पोळ, शहाजी पाटील,अजित टिळेकर यांच्यासह तालुकाभरातील प्रमुख शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

जनआंदोलन उभारण्याचा निर्णय-राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या प्रयत्नामुळे तालुक्यातील २२ गावासह इतर गावातील शेतकऱ्यांना उजनीचे पाणी मिळणार आहे.यामध्ये सोलापूरच्या हक्काचे एक ही थेंब पाणी घेण्यात येणार नाही. पाणी मिळण्यासाठी २२ गावातील शेतकऱ्यांच्या दोन पिढ्या आंदोलन करीत असून तिसरी पिढी ही आंदोलनामध्ये सहभागी झाली आहे. आत्ता नाही तर केव्हाच नाही अशी परस्थिती निमार्ण झाली असून उजनीच्या पाण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी एकमताने लढा देणार असल्याचे शेतकरी कृती समिती सदस्य व २२ गावातील पाण्याप्रश्‍न हातळाणारे निमसाखरचे माजी उपसरपंच नंदकुमार रणवरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT