All political party protest tomorrow in Junnar for kukadi water MLA Atul Benke
All political party protest tomorrow in Junnar for kukadi water MLA Atul Benke sakal
पुणे

Pune : कुकडीच्या पाण्यासाठी उद्या जुन्नर येथे सर्वपक्षीय आंदोलन - आमदार अतुल बेनके

रवींद्र पाटे

नारायणगाव : कुकडी प्रकल्पा अंतर्गत पिंपळगाव जोगे धरणाच्या मृतसाठ्यातील व माणिकडोह धरणातील साडेतीन टीएमसी पाणी येडगाव धरणात सोडून २२ मे २०२३ पासून कुकडी डावा कालव्यात तीस दिवसांचे उन्हाळी दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.

या निर्णयाच्या निषेधार्थ जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या हक्काच्या पाण्यासाठी उद्या(ता.१४) सकाळी दहा वाजता जुन्नर येथे तहसील कार्यालया समोर शेतकरी, सर्वपक्षीय नेते यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.अशी माहिती जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी दिले. कुकडी प्रकल्पातील पाणी साठ्याची सद्यस्थिती व पाणी वाटपा बाबत होत असलेला अन्याय या बाबत माहिती देण्यासाठी आमदार बेनके यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

या वेळी आमदार बेनके म्हणाले ९ मे २०२३ रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे कालवा सल्लागार समितीची बैठक झाली.या वेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी शिल्लक पाणीसाठ्याची वस्तुस्थिती विचारात न घेता कुकडी डावा कालव्यात उन्हाळी दुसरे आवर्तन सोडण्याचे नियोजन केले.

या निर्णयाला मी विरोध केला.जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे हक्काच्या पाणी राखीव ठेवा, माणिकडोह धरणात जुन्नर शहर व परिसरासाठी पाणी राखावी ठेवा, पिंपळगाव जोगे धरणातील तीन टीएमसी ऐवजी दोन टीएमसी पेक्षा कमी पाण्याचा वापर करा.

कुकडी डावा कालव्याचे आवर्तन २२ मे ऐवजी ३० मे पासून सुरु करावे, पिंपळगाव जोगे, डिंभे,माणिकडोह वडज व येडगाव धरणात १५ जुलैपर्यंत पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहील याबाबत दक्षता घ्यावी.आदी सूचना केल्या होत्या. या कडे दुर्लक्ष करून नगर भागातील लोकप्रतिनिधी यांच्या दबावाखाली जलसंपदा विभागाने २२ मे पासून आवर्तने सोडण्याचे नियोजन केले आहे.

कुकडी प्रकल्पात आज अखेर ६.२२५टीएमसी( २१ टक्के) अत्यल्प उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे, कुकडी प्रकल्प नियोजनात सिंचनासाठी उन्हाळी दुसरे अवर्तन सोडण्याचे नियोजन नसल्याने या निर्णयाला लोकप्रतिनिधी या नात्याने माझा विरोध आहे. जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांसाठी पाणीसाठा राखून ठेवल्या शिवाय एक थेंब पाणी कुकडी डावा कालव्यात सोडून दिले जाणार नाही. तालुक्यातील जनतेच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व राजकिय पक्ष,कार्यकर्ते व शेतकरी यांनी रविवारी होणाऱ्या आंदोलनात सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन आमदार बेनके यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT