Corona-Danger 
पुणे

Coronavirus : पुण्यातील ‘त्या’ सर्व रुग्णांचे आरोग्य ठणठणीत

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण पुणे शहरात आढळून आलेल्याला गुरुवारी दहा दिवस झाले. त्यानंतर ही संख्या आठवर गेली. मात्र दहा दिवसांपूर्वी दाखल झालेल्या आणि त्यानंतर दाखल झालेल्या अशा सर्वच रुग्णांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले, त्याला महाराष्ट्रही अपवाद ठरला नाही. या विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण राज्यात सर्वप्रथम पुण्यात सापडला. नऊ मार्च (सोमवारी) हा पहिला रुग्ण आढळून आला. त्यांनतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने विविध उपयोजना हाती घेतल्या. तातडीने त्या रुग्णाला डॉ. नायडू रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्या रुग्णाच्या कुटुंबातील आणखी दोघांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. कालपर्यंत ही संख्या आठवर गेली आहे. 

या विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळून आला, त्यास आज दहा दिवस झाले. या सर्व रुग्णांना केंद्र सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार चौदा दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दररोज त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली जात असून, या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण बरे होऊ शकतात, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Aaditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंचे मौन सुटले; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’

IND vs AFG 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार, पण मग Playing XI मधून बाहेर कोण बसणार? भारताकडे आज व्हाईटवॉश देण्याची संधी

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

SCROLL FOR NEXT